Mahadev Betting App Case : महादेव ॲप प्रकरणी ईडीची दुबईमध्ये मोठी कारवाई
महादेव ऑनलाइन सट्टेबाजी ॲप प्रकरणात (Mahadev Betting App Case) अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई करत सुमारे 1700 कोटी रुपयांच्या 20 स्थावर मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त केल्या आहेत.

Mahadev Betting App Case : महादेव ऑनलाइन सट्टेबाजी ॲप प्रकरणात (Mahadev Betting App Case) अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई करत सुमारे 1700 कोटी रुपयांच्या 20 स्थावर मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त केल्या आहेत.
जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांपैकी (Mahadev Betting App Case) 18 मालमत्ता संयुक्त अरब अमिराती (यूएई) मधील दुबई येथे आहेत, तर दोन मालमत्ता देशाची राजधानी नवी दिल्लीत आहेत.
दुबईमध्ये जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये जगातील सर्वात उंच इमारत असलेल्या बुर्ज खलिफामधील अनेक आलिशान फ्लॅट्स, दुबई हिल्स इस्टेटमधील लक्झरी व्हिला आणि बिझनेस बे कमर्शियल डिस्ट्रिक्टमधील हाय-एंड फ्लॅट्सचा समावेश आहे. याशिवाय, एसएलएस हॉटेल अँड रेसिडेन्सेससारख्या नामवंत टॉवर्समधील मालमत्ताही अटॅच करण्यात आल्या आहेत.
ईडीच्या तपासानुसार, या सर्व मालमत्ता महादेव सट्टेबाजी ॲपचा मुख्य प्रवर्तक सौरभ चंद्राकर याच्याशी संबंधित व्यक्ती आणि संस्थांच्या नावावर होत्या. तपासात असे स्पष्ट झाले आहे की, या मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरलेला पैसा अवैध सट्टेबाजीतून मिळालेल्या कमाईचा म्हणजेच प्रोसीड्स ऑफ क्राईमचा भाग होता. Mahadev Betting App Case
छत्तीसगडचा रहिवासी असलेला सौरभ चंद्राकर आणि त्याचा सहकारी रवि उप्पल यांनी हे संपूर्ण जाळे फ्रँचायझी मॉडेल म्हणून उभे (Mahadev Betting App Case) केले होते. या अवैध व्यवसायातील नफ्याचा सुमारे 70 ते 75 टक्के हिस्सा प्रवर्तकांकडे जात असे, तर उर्वरित हिस्सा पॅनेल ऑपरेटरमध्ये विभागला जात असे.






