पुणे (नांदुर.ता.दौंड ) – नांदुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नवरात्रोत्सवाच्या (Navratri) निमित्ताने विविध कार्यक्रम घेण्यात आले.यावेळी महाभोंडला मुलगी वाचवा,मुलगी शिकवा हा संदेश देत पारंपारिक सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.(Nandur jilha Parishad school) कार्यक्रमात फलकावर काढलेल्या हत्तीच्या चित्राची पूजा करण्यात आली.त्यानंतर हत्तीचे चित्र मध्यवर्ती ठेवून शाळेतील विद्यार्थीनी तसेच गावातील माहिला,व शिक्षिकांनी ‘सासूरवाशीन सून रुसून बसली कैसी,कारल्याचा वेल,ऐलमा पैलमा आदी गाण्यांवर ठेका धरुन फेर धरण्यात आला. शाळेतील शिक्षका यांनी शाळेतील मुलींना भोंडल्याचे महत्व पटवून दिले.यावेळी शाळेत मुख्यध्यपाक राजाराम मोरे,अनिल टिळेकर,संभाजी जवळकर,मोहन कोलते,शालीणी पवार,माधुरी वेल्हाळ.आदी उपस्थिती होते.