Satara News : दरड कोसळल्यामुळे महाबळेश्वर ते पोलादपुर रस्ता वाहतुकीसाठी बंद
Updated On:

महाबळेश्वर : सध्या महाबळेश्वरमध्ये पावसाचा जोर चांगल्या प्रमाणात असून महाबळेश्वर ते पोलादपूरला जाणाऱ्या रस्त्यावरती पोलादपूर हद्दीमध्ये दरड कोसळली आहे. यामुळे महाबळेश्वरहून पोलादपूरला प्रवास करणाऱ्या वाहनांसाठी हा रस्ता पुढील २ ते ३ दिवस बंद करण्यात आला आहे.
पोलादपूर भागात दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून याबाबत पोलादपूर तहसीलदार यांच्या मार्फत महाबळेश्वर तहसीलदार यांना सदर घटनेची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार सुरक्षिततेच्या कारणास्तव तसेच या मार्गे वाहतून करणाऱ्या प्रवाशाला त्रास होऊ नये, या दृष्टीने महाबळेश्वर ते पोलादपूर प्रवास करण्या प्रवाश्यांना महाबळेश्वर येथे सूचना देण्याबाबत कळवले आहे. यांचीच दखल घेत पोलादपूरकडे जाणाऱ्या वाहनांना महाबळेश्वर येथील महाड नाका परिसरात वाहन चालकांना सूचना करून दुसऱ्या मार्गे पाठविले जात आहे.





