Mahabaleshwar: महाबळेश्वरमध्ये मुसळधार पाऊस; लिंगमळा धबधबा ओसंडून वाहू लागल्याने पर्यटक मंत्रमुग्ध
Mahabaleshwar :विलोभनीय दृश्यामुळे पर्यटक मंत्रमुग्ध

Mahabaleshwar : महाबळेश्वरमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. या मुसळधार पावसामुळे निसर्गाचे सौंदर्य अधिकच खुलले असून, पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेला प्रसिद्ध लिंगमळा धबधबा प्रवाहित झाला आहे. धबधब्याचे हे विलोभनीय दृश्य पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे.
धुक्याची चादर आणि सोसाट्याचा वारा यांमुळे लिंगमळा परिसराला एक वेगळेच सौंदर्य प्राप्त झाले आहे. या भागातून दिसणारे निसर्गाचे विलोभनीय दृश्य पाहून येथे येणारे पर्यटक मंत्रमुग्ध होत आहेत. निसर्गाच्या या अद्भूत रूपाचा आणि मुसळधार पावसाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
पर्यटकांना आवाहन
पावसाचा जोर वाढत असल्यामुळे धबधबा परिसर आणि जंगलातील वाटा प्रचंड निसरड्या झाल्या आहेत. त्यामुळे पर्यटकांनी अतिउत्साहात येऊन कोणत्याही धोकादायक ठिकाणी जाऊ नये, सेल्फी काढताना किंवा निसरड्या वाटेवरून चालताना योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा:





