पुणे | काशेवाडीत नवरात्र उत्सवानिमित्ताने महाआरती

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – नवरात्र उत्सवाच्या पवित्र पर्वानिमित्ताने काशेवाडी भागातील अशोक तरुण मंडळ आणि अण्णा भाऊ साठे मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. या महाआरतीसाठी परिसरातील शेकडो महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
भाजपा कसबा मतदारसंघाचे समन्वयक व स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासणे, प्रभाग क्र.१९च्या माजी नगरसेविका अर्चना पाटील तसेच भारतीय जनता पार्टी पुणे शहर उपाध्यक्ष तुषार पाटील उपस्थित होते.
मंडळाचे यंदाचे हे ५१ वे वर्ष आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महिलांच्या हस्ते महाआरतीचा उपक्रम राबविला जातो. माजी नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाला सुरूवात झाली.
यावर्षी सुमारे ४०० महिलांनी या उपक्रमात सहभाग घेतला. सर्व स्तरातील महिलांना आरतीचा सन्मान मिळावा, त्यानिमित्ताने एकत्र येत उत्सव साजरा व्हावा या हेतूने या उपक्रमाची सुरुवात केल्याचे अर्चना पाटील यांनी सांगितले.





