Actress Madhuri Dixit : माधुरीने सांगितली परदेशातली आठवण! मिस्टर नेनेंसाठी अवलंबली होती नवी दिनचर्या; स्वतः केला खुलासा, काय सांगितलं पाहा…

Actress Madhuri Dixit : अभिनेत्री माधुरी दिक्षितीने ९० च्या दशकातील आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. चित्रपटातील अभिनयासोबत तिच्या नृत्यानचेही प्रेक्षक दिवाने आहेत. मात्र, ज्यावेळी माधुरीने डॅा. नेने यांच्यासोबत लग्न केले त्यानंतर ती परदेशात गेली होती.
त्यानंतर तिने काही काळ कलाविश्वापासून दूर राहणे पसंत केले होते. नुकत्याच एका मुलाखती तिने अमेरिकेतीन आठवणींना उजाळ देत एक स्पेशल गोष्ट शेअर केली आहे. माधुरीने स्वयंपाकात मन रमवून डॅा नेने यांच्यासाठी त्यांच्या आवडीचे पदार्थ त्यांना स्वतः बनवून खावू घातले. सकाळी साडेपाच वाजता उठून त्यांच्यासाठी नाश्ता तयार करत असल्याचे तिने सांगितले.
जेवणाच्या वेगवेगळ्या रेसिपी तयार करण्यासाठी तिने सोबत पाककलेचे पुस्तकही ठेवले होते. अभिनेत्री माधुरी दिक्षितने डॅा. श्रीराम नेने यांच्यासोबत १९९९ मध्ये लग्न केले. यानंतर ती अमेरिकत राहून पुन्हा भारतात परतली. आता पुन्हा एकदा कलाविश्वात सक्रिय झाली आहे.
काय करायची माधुरी?
अमेरिकेत गेल्यानंतर माधुरीने दररोजचे एक रुटीन तयार केले होते. त्यानुसार ती रोज सकाळी साडेपाच वाजता उठायची. तिचे पती डॉ. श्रीराम नेने कार्डिओथोरॅसिक सर्जन म्हणून काम करत असल्याने त्यांना लवकर जावं लागायचं. त्यामुळे त्यांच्यासाठी सकाळचा नाश्ता ती स्वतः बनवून त्यांना द्यायची, या काळात तिने अनेक गोष्टी शिकल्या असल्याचा खुलासा माधुरीने केला आहे.
हेही वाचा : राधिका यादवच्या जिवलग मैत्रिणीने मारेकरी वडिलांचा केला पर्दाफाश ; ‘लव्ह जिहाद’चाही केला उल्लेख





