‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटाचे माधुरी दीक्षितकडून कौतुक, प्रेक्षकांना आवाहन करत म्हणाली, ’हा सुंदर अनुभव घेण्यासाठी…’

Fussclass Dabhade Movie: हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘फसक्लास दाभाडे’ हा चित्रपट मोठ्या पडद्यावर रिलीज झाला आहे. या चित्रपटाच्या गाणी सोशल मीडियावर विशेष गाजली. आता थिएटरमध्ये या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक कलाकाराकंडून हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहावा, असे आवाहन केले जात आहे. आता बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितने देखील या चित्रपटाचे कौतुक केले आहे. तसेच, प्रेक्षकांनी हा चित्रपट आवर्जुन पाहावा, असे म्हटले आहे.
माधुरी दीक्षितने इंस्टाग्रामवर स्टोरीज शेअर करत ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटाचे कौतुक केले आहे. चित्रपटाचे कौतुक करत इंस्टाग्राम स्टोरीमध्ये माधुरीने लिहिले की, ‘सिद्धार्थ चांदेकर व टीम तुम्हा सर्वांना या चित्रपटासाठी खूप खूप अभिनंदन! ही हृदयस्पर्शी कथा प्रेक्षकांसमोर आणल्याबद्दल तुमचे खूप आभार. हा सुंदर अनुभव घेण्यासाठी जवळच्या सिनेमागृहात जाऊन ‘फसक्लास दाभाडे’ नक्की पाहा आणि ‘फसक्लास’ अनुभव घ्या.’
माधुरीने चित्रपटाचे कौतुक केल्यानंतर अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने देखील तिचे आभार मानले. माधुरीसोबतच, अमृता खानविलकर, गायत्री दातार, आदित्य सरपोतदार यांनी देखील प्रेक्षकांना हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन नक्की पाहा, असे आवाहन केले आहे.
दरम्यान, रिलीजनंतर ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी थिएटरमध्ये गर्दी केली. ‘फसक्लास दाभाडे’मध्ये क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, राजसी भावे, निवेदिता सराफ, हरीश दुधाडे, राजन भिसे, उषा नाडकर्णी आणि मिताली मयेकर या कलाकारांची प्रमुख भूमिका आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंत ढोमेने केले आहे.





