M S DHONI साऊथच्या टॉलिवूडमध्ये आजमावणार नशीब, सिनेसृष्टीमधील नव्या इनिंगबाबत केली ‘ही’ घोषणा

मुंबई – महेंद्रसिंह धोनी हे नाव आज सर्वांना परिचित आहे. धोनीचे क्रिकेटमधील नेतृत्व आणि त्याची कारकीर्द आठवली की आजही अनेकांना भारताने जिंकलेले वर्ल्डकप आठवतात. कोणी त्याला धोनीचं नशीब म्हणत तर कोणी मेहनत. सध्या धोनी आयपीएलमधील चैन्नईच्या टीम व्यतिरिक्त फारसा कुठे दिसत नाही. धोनीची फॅन फॉलोविंग मात्र दिवसेंदिवस वाढत चालली आहे. म्हणून कदाचित धोनीने चित्रपट निर्मितीसाठी प्रोडक्शन हाऊस खोलण्याचा निर्णय घेतला आहे.
स्वतःच्या प्रोडक्शन हाऊसची घोषणा केल्यानंतर आता धोनी स्वतः पडद्यावर दिसणार का ? याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. ‘धोनी इंटरटाइनमेंट’ या नावाने धोनीने आपल्या प्रोडक्शन हाऊसची सुरुवात केली आहे. ही कंपनी तमिळ,तेलगू आणि मल्याळम भाषेत काम करणार असल्याचे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.
#LetsCinema EXCLUSIVE: Dhoni is launching his film production company in south ‘Dhoni Entertainment’ to produce films in Tamil, Telugu and Malayalam. pic.twitter.com/zgTxzdSynT
— LetsCinema (@letscinema) October 9, 2022
धोनीने क्रिकेटचे मैदान कसे गाजवले हे आपण एम एस धोनी या चित्रपटातून पहिले आहे. धोनीच्या आयुष्यावरील हा चित्रपट सगळ्यांनाच खूप आवडला होता. परंतु आता धोनी स्वतः आपल्या कंपनीद्वारे सिनेसृष्टीत एक वेगळी इनिंग सुरु करत असल्यामुळे सर्वांना तो मोठ्या पडद्यावर दिसणार का याची प्रतीक्षा आहे. अशात साऊथ इंडस्ट्रीमध्ये तो काम करणार असल्यामुळे त्याची क्रेज आणखी वाढणार हे मात्र निश्चित आहे.

