Malaika Arora : मलायकाकडून लंच पार्टी! सलमान अरबाजसह खान कुटुंब आलं एकत्र, VIDEO होतोय व्हायरल

Malaika Arora : बॅालिवूड अभिनेत्री मलायका अरोराने नुकतीच खान कुटुंबातील सदस्यांसाठी लंच पार्टीचं आयोजन केलं होतं. सलमान खान आणि तिचा एक्स पती अरबाज खान याच्यासह खान कुटुंबातील सदस्य या पार्टीसाठी आले होते. अरबाजच्या बहिणी अलविरा-अर्पिता यांना देखील याचं निमंत्रण देण्यात आलं होतं. या लंच पार्टीच्या निमित्ताने खान कुटुंब एकत्र आल्याचं पाहायला मिळालं.
मलायाका आता बिझनेस वुमन बनली आहे. तिने सुरू केलेल्या नव्या रेस्टॅारंटमध्ये जेवणाचं आयोजन करण्यात आलं होतं. आता सोशल मीडियावर त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मलायका आणि अरबाज यांनी २०१७ मध्ये एकमेकांपासून विभक्त होत घटस्फोट घेतला. मात्र, मलायकाने अरबाजसोबचत घटस्फोट जरी घेतला असला तरी त्यांच्या कुटुंबाशी असलेला जिव्हाळा कायम ठेवला आहे. आता मलायकाने तिच्या व्यवसायावर लक्ष केंद्रित केलं आहे.
मलायकाने आयोजित केलेल्या लंच पार्टीला अलविरा खान (अग्निहोत्री) आणि अर्पिता खान शर्मा यांना जेवणासाठी आमंत्रित केलं होतं. मलायकाच्या निमंत्रणावरून सलमान खानच्या दोन्ही बहिणी त्यांच्या मुलांसह आल्या होत्या.
View this post on Instagram
अरबाज खान आणि मलायकाचा मुलगा अरहान खान, तसेच सोहेल खान आणि सीमा सजदेहचा मुलगा निर्वाण खान हे देखील आवूर्जन आल्याचे पाहायला मिळाले. याशिवाय मलायकाची बहीण आणि अभिनेत्री अमृता अरोरा देखील उपस्थित होती. या सर्वांनी लंच पार्टी झाल्यानंतर पापाराझींसाठी पोझ दिली आणि एकत्र आल्याचा आनंद लुटला.
अरबाजपासून घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अरोरा अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. मात्र, गेल्या काही काळापासून त्यांच्यातील नात्यात दुरावा आला आहे का अशी देखील चर्चा अधूनमधून होत असते. अरबाज आणि मलायका यांचे वैवाहिक जीवन आठ वर्ष सुरू होते. पण दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. अरबाज खानबद्दल बोलायचं झालं तर, त्याने २०२३ मध्ये शूरा खानशी लग्न केलं आहे.
हेही वाचा : “अमेरिका डोळे वटारत असताना पंतप्रधान चीनला चालले, जगात कुठली जागा नसेल…”; उद्धव ठाकरेंचा मोदींवर घणाघात





