यूपीमध्ये ईडीची मोठी कारवाई, माजी सपा आमदाराची 8.24 कोटींची मालमत्ता जप्त
Updated On:

लखनौ – अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) भूमाफिया आणि सपाचे माजी आमदार आरिफ अन्वर हाश्मी यांच्यावर कारवाई सुरू केली आहे. ईडीने बलरामपूरच्या उत्रौला मतदारसंघाचे आमदार राहिलेल्या हाश्मी आणि त्यांची पत्नी रोझी सलमा यांच्या लखनौ, बलरामपूर आणि गोंडा येथे असलेल्या 8.24 कोटी रुपयांच्या 21 मालमत्ता जप्त केल्या आहेत.
यामध्ये सदनिका, शेतजमिनी आणि व्यावसायिक जमिनींचा समावेश आहे. ईडीने नुकतीच हाश्मी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या बँक खात्यांचीही चौकशी केली होती. ईडी लवकरच आणखी काही मालमत्ता जप्त करण्याच्या तयारीत आहे. माजी आमदार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या बेनामी संपत्तीचीही चौकशी सुरू आहे.





