Video : भलते धाडस नको रे बाबा; ‘नशीब बलवत्तर’ असल्याने तरुण बचावला

Updated On:

जुन्नर(प्रतिनिधी) – जुन्नर तालुक्‍यात पुराच्या पाण्यात वाहून गेलेला तरुण नशीब बलवत्तर असल्याने सुदैवाने बचावला आहे. जुन्नर तालुक्‍यात सध्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे ओढे नाले यांना पूर आल्याचे चित्र दिसत आहे.

जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून घराबाहेर पडू नये असा इशारा देण्यात आला आहे. तरीही नागरीक जीव धोक्‍यात घालून पुराच्या पाण्यातून रस्ता ओलांडण्याचा प्रकार करत आहेत. जुन्नर तालुक्‍यातील गोद्रे गावातील एक तरुण पावसाच्या पाण्यात वाहून गेला होता.

एकनाथ रेंगडे असे तरुणाचे नाव असून तो गोद्रे येथील रहिवासी आहे. तरुणाचे नशीब बलवत्तर म्हणून तो सुरक्षित सापडला आहे. तरी नागरिकांनी याबाबत काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

आणखी संबंधित बातम्या

Banana Farmers : जुन्नरचा बळीराजा संकटात! ६ लाखांचा खर्च अन् २ लाखांची कमाई; केळी उत्पादकांचे कंबरडे मोडले

2026-04-13 03:30:32

Banana Farmers : जुन्नरचा बळीराजा संकटात! ६ लाखांचा खर्च अन् २ लाखांची कमाई; केळी उत्पादकांचे कंबरडे मोडले

Ram Navami 2026 : आळेफाट्यात रामनवमीचा नवा अवतार! साध्या पूजेपासून ते भव्य लोकोत्सवापर्यंत; पाहा बदललेलं स्वरूप

2026-03-27 03:45:34

Ram Navami 2026 : आळेफाट्यात रामनवमीचा नवा अवतार! साध्या पूजेपासून ते भव्य लोकोत्सवापर्यंत; पाहा बदललेलं स्वरूप

Stray Dog News : कुत्र्यांमध्ये लांडग्यांचे अंश? आळेफाट्यातील भटक्या कुत्र्यांच्या आक्रमकतेने शास्त्रज्ञही चक्रावले

2026-03-21 04:30:54

Stray Dog News : कुत्र्यांमध्ये लांडग्यांचे अंश? आळेफाट्यातील भटक्या कुत्र्यांच्या आक्रमकतेने शास्त्रज्ञही चक्रावले

Otur Accident : पहाटेचा प्रवास ठरला शेवटचा! स्विफ्ट-पिकअपची जोरदार धडक; तरुणाचा जागीच मृत्यू

2026-03-19 02:30:20

Otur Accident : पहाटेचा प्रवास ठरला शेवटचा! स्विफ्ट-पिकअपची जोरदार धडक; तरुणाचा जागीच मृत्यू

Banjara reservation : माझ्या आत्महत्येला सरकार जबाबदार.! बंजारा आरक्षणासाठी तरुणाने जीवन संपवले

2025-10-28 17:49:10

Banjara reservation : माझ्या आत्महत्येला सरकार जबाबदार.! बंजारा आरक्षणासाठी तरुणाने जीवन संपवले