LPG Cylinder Price : सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले! घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
LPG Cylinder Price: घरगुती गॅसच्या दरवाढीमुळे मुंबईतील 14.2 किलोच्या एलपीजी सिलेंडरचा दर 912.50 रुपयांवरुन 941.50 रुपयांवर

LPG Cylinder Price : महागाईची झळ दिवसेंदिवस तीव्र होत असल्याचे चित्र आहे. यातच आता सर्वसामान्यांना आणखी एक मोठा झटका बसला आहे. घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार एलपीजी (LPG) सिलेंडरचा भाव 29 रुपयांनी वाढला आहे. गेल्या तीन महिन्यांतील ही दुसरी दरवाढ आहे. या ताज्या दरवाढीमुळे दिल्लीत १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत ९१३ रुपयांवरून ९४२ रुपये झाली आहे. आज सकाळपासून नवे दर लागू झाले आहेत.
आखाती देशात सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक तेल आणि वायू पुरवठ्यात ताण येत असतानाच ही दरवाढ करण्यात आली आहे. २९ रूपयांची ही दरवाढ देशभरात लागू झाली आहे. स्थानिक कर आणि वाहतूक खर्चातील फरकामुळे सिलेंडरचे दर प्रत्येक शहरानुसार वेगळे असतील. मागील महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी ७ रूपयांची वाढ झाली होती.
घरगुती गॅसच्या दरवाढीमुळे मुंबईतील 14.2 किलोच्या एलपीजी सिलेंडरचा दर 912.50 रुपयांवरुन 941.50 रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. याआधी ७ मार्च रोजी घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात ६० रुपयांची वाढ झाली होती. त्यानंतर आता २९ रुपयांची दरवाढ झाली आहे. गॅसचे उत्पादन करणाऱ्या सरकारी कंपन्या अजूनही तोटा सहन करत आहेत. त्यामुळे भविष्यात गॅस सिलिंडरच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमुळे (PMUY) भारतीय कुटुंबांना स्वस्त दरात स्वयंपाकाचा गॅस खरेदी करता येतो.
जूने आणि नवे गॅस सिलिंडरचे दर –
दिल्ली: पूर्वी ९१३ रुपये, आता ९४२ रुपये
मुंबई: पूर्वी ९१२.५० रुपये, ९४१.४० रुपये
कोलकाता: पूर्वी ९३९ रुपये, ९६८ रुपये
चेन्नई: पूर्वी ९२८.५० रुपये, ९५७.५० रुपये
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक वापराच्या एलपीजीच्या दरात वाढ केली होती. 1 जून रोजी कमर्शियल एलपीजी गॅस सिलेंडरचे दर 42 रुपयांनी वाढला होता. गेल्या पाच महिन्यात 19 किलोच्या सिलेंडरचे दर दुप्पट झाले आहेत. 1 जानेवारीपूर्वी 19 किलोच्या सिलेंडरचा दर 1580 रुपये होता. 1 जूनला तोच दर आता 3113.50 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच 19 किलोच्या एलपीजीच्या दरात दुप्पट वाढ झाली आहे.
हेही वाचा:





