Saiyara Box Office Collection : लव्हस्टोरीने रचला नवा इतिहास ! बॅाक्स अॅाफिसवर सैयारा सुसाट…! लवकरच 200 कोटीचा टप्पा पार करणार

Saiyara Box Office Collection : सध्या बॅाक्स अॅाफिसवर सैयारा या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. या वर्षातल्या अनेक चित्रपटांचे रेकार्ड सैयाराने मोडले असून, चित्रपटाच्या कमाईची यशस्वी घोडदोड कायम आहे. रिलीज झाल्यापासून या चित्रपटाने प्रेक्षकांच्या पसंतीची पोचपावती मिळवली. चित्रपटाचा जॅानर हा लव्हस्टोरी फॅार्ममधला असून, प्रेक्षकांना तो खूप भावाला आहे.
सैयाराच्या प्रेमकथेने सर्वांना वेडं लावलं आहे. मोहित सुरीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळत आहे. यामुळे आता येत्या काही दिवसांत रिलीज होणाऱ्या चित्रपटांनावर याचा परिणाम होणार का हे पाहणे महत्वाचे असणार आहे. खरंतर सैयाराचा ट्रेलर, गाणी आणि माऊथपब्लिसिटीचा मोठा फायदा चित्रपटाला झाल्याचे दिसत आहे.
या चित्रपटातील अनीत पड्डा आणि अहान पांडे मुख्य भूमिकेत झळकले आहेत. या नव्या जोडीने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. चित्रपटातील गाण्यांची क्रेझ अजूनही कायम आहे. सैयारा दुसऱ्या विकेंटमध्ये दाखल झाला असून, अवघ्या ८ दिवसांत चित्रपटाने 190.25 कोटी रुपयांची कमाई केली असून, लवकरच २०० कोटीचा टप्पा चित्रपट पार करणार असल्याचे दिसत आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, सैयारा या चित्रपटाचे बजेट ४० ते ६० कोटींच्या दरम्यान आहे. या चित्रपटाचे ओटीटी राइट्स नेटफ्लिक्सने विकत घेतले आहे. त्यामुळे येत्या 2 ते 3 महिन्यांनंतर ही रोमँटिक लव्हस्टोरी तुम्हाला ओटीटीवर पाहायला मिळणार आहे.
कमाईचे आकडे
पहिला दिवस – 21 कोटी रुपये
दुसरा दिवस – 26 कोटी रुपये
तिसरा दिवस – 37.75 कोटी रुपये
चौथा दिवस – 24 कोटी रुपये
पाचवा दिवस – 25 कोटी रुपये
सहावा दिवस – 21 कोटी रुपये
सातवा दिवस – 15.13 कोटी रुपये
आठवा दिवस – 17.50 कोटी रुपये
एकूण – 190.25 कोटी रुपये





