शिर्डी, – भगवान महावीरांच्या जिओ और जिने दो या मंत्राची खरोखरच आज जगाला गरज असून, समाजातील भावी पिढीवर चांगले संस्कार करण्यासाठी व मार्गदर्शन करण्यासाठी सर्व समाजबांधवांनी एकत्र येऊन काम करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. जैन समाज नेहमीच सत्य, अहिंसा यांचे पालन करत आहे. अशावेळी शिर्डीलगत उभारण्यात आलेले ज्ञानतीर्थ व जैन काच मंदिर भविष्यात देशभरातून येणाऱ्या सर्व जैन बांधवांसाठी व भावी पिढीसाठी प्रेरणादायी व श्रध्दास्थान ठरेल, असा विश्वास नमोकार तीर्थ प्रणेता आचार्य देवनंदी महाराज यांनी प्रवचनातून व्यक्त केला.
शिर्डी शहरात त्यांचे आगमन झाले असता सकल जैन समाजाच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. याप्रसंगी जैन बंधू-भगिनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या. आचार्य देवनंदी महाराज म्हणाले, सर्व समाज बांधव व दानशूर भाविक यांच्या योगदानामुळे नमोकार तीर्थक्षेत्र काम प्रगती पथावर असून लवकरच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. त्यासाठी सर्व समाज बांधवानी आपला सहभाग नोंदवण्यासाठी उपस्थित रहावे, असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी जैन समाजाचे अध्यक्ष सतिश गंगवाल, किशोर गंगवाल, अशोक गंगवाल ,जैन अल्पसंख्याक महामंडळाचे उपाध्यक्ष ललित पाटणी, शिखर कासलीवाल, बाबुलाल पाटणी, प्रदीप सोनी, संजय लोहाडे , निलेश गंगवाल ,प्रतिक गंगवाल, मंगेश गंगवाल, ललित गंगवाल, विनोद गंगवाल , किशोर पाटणी, धीरज लोढा ,नरेश पारख, प्रफुल्ल सुराणा, अशोक काळे, राजेंद्र गंगवाल, प्राजक्ता गंगवाल, हेमलता गंगवाल, हर्षमाला गंगवाल, छाया कासलीवाल, सारिका गंगवाल , मीना सोनी, दर्शना सेठी, राणी गंगवाल आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Remarks :