सण-उत्सव : सार्वभौम गणेश…

गणेश हे शिवपुत्र आहेत असे आपण समजतो; पण खरेतर शिवपार्वतीने गणपतीकडून वर मागून घेतला की त्यांनी त्यांच्या पोटी पूजारूपाने जन्म घ्यावा. गणेशाने त्यांचे मागणे मान्य करून अवतार धारण केला. ब्रह्मचा ब्रह्मलोक, विष्णूचा विष्णूलोक, महेशाचा शिवलोक, शक्तीचा शक्तीलोक, सूर्याचा आदिलोक गणेशाची पूजा करतात.
गणपतीला नेवेद्य दाखवताना तुळशीचे पान ठेवत नाहीत, तर दोन दूर्वा ठेवाव्यात. पांढरे चंदन कधीही लावू नये तर रक्तचंदन लावावे मूर्तीला दोन दुर्वा घरात असेल तर जरूर अर्पण कराव्यात असा उल्लेख गणेश पुराणात आढळतो. दुर्वा दुःखाचे निवारण करते ती दुर्वा, दुहिता. गणेशाला का आवडते दुर्वा, ब्राह्माडाची निर्मिती झाली पण विविध जीवांच्या अन्नाची समस्या समोर होती. ब्राह्मदेवाने दुर्वेवर संपूर्ण विश्वाच्या उदरभरणाची जबाबदारी सोपवली, मात्र तिला अहंकार आला. देवी अन्नपूर्णेचा तिने अपमान केला म्हणून तिला गवत रूप मिळाले.
अनलासूर राक्षस गिळल्यावर दाह झाला. गणेशाला दहा दुर्वा अर्पण केल्यावरच ती शांत झाली. तेव्हापासून गणेशाला दुर्वा प्रिय झाली. गणेश उपासनेतून निर्माण होणारी उष्णता शांत करण्यासाठी दाहशमन दुर्वा अर्पित करतात. दुःख हरिता ती दुर्वा म्हणून आपल्या चिंता गणेशचरणी समर्पित करण्याची ही प्रतिकात्मक दुर्वा.
21 दुर्वाचेही महत्त्व आहे. दुःखहरिता दुर्वा. दुःख कशापासून तर षडरिपू काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, मद येतात ते आपले जीवनगाणे त्यामुळे हा प्रपंच… पाचा चा एकत्र त्याचा प्रपंच. मग त्यात मन, बुद्धी, अहंकार, चित्त हे चार स्थान तर सत्व, रज, तम हे गुण जे स्वार होतात. द्वैत आणि अद्वैत या दोन खांबावर असे म्हटले तर अशा अद्वैतपासून आपण दूर जातो म्हणून तर दुःख. मग बघा षडरिपू पाच प्रपंच, चार वृत्ती, दोन खांब आणि तीन गुण अशा गोष्टी एकत्र केल्या म्हणजे आपण आपली अद्वैत वृत्ती तयार झाली ती गणेश चरणी दुर्वार्पण करण्याची प्रतिकात्मक पद्धत ती ही 21 दुर्वांची जुडी. रोज शक्य नसेल स्थळ काळानुसार तर चांदीची दूर्वा आहेच अगदी नसेल तर दूर्वा रुपी अक्षदा आहेतच. श्रीगणेश अग्रपूजनाचा मान असणारी देवता म्हणून सार्वभौम गणेश असे म्हणतात.





