Lonikand Accident : लोणीकंदमध्ये काळजाचा थरकाप! डंपरच्या धडकेत २२ वर्षीय तरुणाचा जागीच अंत; चालक पसार
Lonikand Accident : कामावरून परतत असताना लोणीकंद येथे बांदल पेट्रोल पंपासमोर घडली दुर्घटना; २२ वर्षीय तरूणाचा उपचारापूर्वीच मृत्यू.

Lonikand Accident : हायवा डंपरने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू गंभीर जखमी होऊन मृत्यूझाल्याची घटना पुणे-अहिल्यानगर महामार्गावर लोणीकंद येथे बांदल पेट्रोल पंपासमोर गुरुवारी (दि.५) सकाळी पावणे सहाच्या सुमारास घडली. या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमोल चव्हाण (वय २२, रा. लोणीकंद) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. आंबादास कचरू लष्कर (रा. वाघोली) असे गुन्हा दाखल केलेल्या डंपरचालकाचे नाव आहे. अमोल चव्हाण गुरुवारी (दि. १) सकाळी कामावरून आल्यानंतर पेट्रोल पंपावर लावलेली गाडी घेऊन घरी जात असताना डंपरने दुचाकीला धडक दिली आणि चालक पसार झाला.
अमोल हा अपघातात खाली पडून गंभीर जखमी झाला होता. इतर डंपर चालकांनी अपघात झालेल्या अमोल याच्या भावाला अपघाताची माहिती देऊन खाजगी रुग्णालयात हलविले. मात्र डॉक्टरांनी त्यास उपचारापूर्वीच मृत घोषित केले. याबाबत दीपक चव्हाण (रा. लोणीकंद) यांनी फिर्याद दिली आहे.





