Kartik Aaryan New Teaser | ‘आशिकी’ आणि ‘आशिकी 2’ चित्रपटाच्या यशानंतर आता चाहते ‘आशिकी 3’ची आतुरतेने वाट पाहत आहेत. श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय यांच्या मुख्य भूमिकेतील ‘आशिकी 2’ 2013 मध्ये प्रदर्शित झाल होता. या चित्रपटातील गाण्याची आजही मोठी क्रेझ आहे. यातच आता ‘आशिकी 3’चा टीझर समोर आला आहे. ज्यात अभिनेता कार्तिक आर्यन त्याच्यासोबत ‘पुष्पा 2’ फेम अभिनेत्री श्रीलीला दिसत आहे.
कार्तिक आर्यनने सोशल मीडियावर या टीझरची पहिली झलक शेअर केली आहे. अनुराग बसू यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाचं नाव अद्याप जाहीर झालेलं नाही. परंतु टीझर पाहिल्यानंतर हा ‘आशिकी 3’ चा असल्याचं बोललं जातं आहे. या चित्रपटाचे शीर्षक अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. Kartik Aaryan New Teaser |
‘आशिकी 2’ मध्ये ज्याप्रमाणे आदित्य रॉय कपूर स्टेजवर गायकाची भूमिका साकारताना दिसला होता, त्याचप्रमाणे या टीझरमध्ये कार्तिक आर्यन दिसत आहे. लांब केस, लांब दाढी, हातात गिटार, कार्तिकचा हा हटके लूक फारच आकर्षक वाटत आहे. Kartik Aaryan New Teaser |
View this post on Instagram
कार्तिक आर्यनने आपल्या आगामी चित्रपटाचा टीझर इन्स्टाग्राम हँडलवर रिलीज केला आहे. हा व्हिडिओ कार्तिक आर्यनच्या हृदय तुटलेल्याआशिकीपासून सुरू होतो. कार्तिक आर्यन मैफिलीत एक गाणे गाताना दिसत आहे. त्याच्या तोंडात एक सिगारेट आणि हातात गिटार आहे.
दरम्यान, कार्तिक आर्यनबरोबर अनुराग बासूच्या चित्रपटात सुरुवातीला तृप्ती डिमरी होती. पण काही कारणास्तव तिला चित्रपटातून वगळण्यात आले. यानंतर आता या चित्रपटात श्रीलालाची एन्ट्री झाली आहे. यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा :
“दिल्लीतील चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा खोटा; 120 ते 150 लोक मरण पावले”, संजय राऊतांचा दावा