Sanjay Raut | प्रयागराज येथील महा कुंभमेळ्याला जाण्यासाठी शनिवारी रात्री नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर मोठी गर्दी झाली होती. प्लॅटफॉर्म क्रमांक 14 आणि 15 वर प्रचंड गर्दी झाल्याने ही दुर्दैवी घटना घडली. या चेंगराचेंगरीत 18 जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी (15 फेब्रुवारी) रात्री आठ ते साडे आठच्या सुमारास चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. याप्रकरणी आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 120 ते 150 लोक चेंगराचेंगरीमध्ये मरण पावले असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
काय म्हणाले संजय राऊत? Sanjay Raut |
“दिल्लीतील रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत किती लोक मृत्यूमुखी पडले याचा सरकारने दिलेला आकडा खोटा आहे. माझ्या माहितीप्रमाणे किमान १२० ते १५० लोक चेंगराचेंगरीत मरण पावले आहेत. सरकार आकडा लपवत आहे. महाकुंभला जाण्यासाठी भाजपाकडून निमंत्रण दिले जात आहे. जणू काही हा भाजपाचा सोहळा आहे. लोकांना असे भ्रमित केले जात आहे की, तुम्ही फक्त या. तुमच्यासाठी गाड्या, जेवण-राहण्याची व्यवस्था सर्व काही केले आहे. पण तसे काही नाही. इतकी अव्यवस्था कोणत्याच कुंभमध्ये झाली नव्हती.” असे संजय राऊत यांनी म्हंटले आहे.
संजय राऊत पुढे म्हणाले, “मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ काल सांगत होते की, ५० कोटी लोक कुंभमेळ्यात आले. पण मेले किती? याचा आकडा कधी सांगणार? प्रयागराजमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत किती लोक मरण पावले? कुंभमेळ्यात सात हजार लोक बेपत्ता झाले आहेत. एकतर हे लोक चेंगराचेंगरीत मरण पावलेत किंवा बेपत्ता झाले आहेत. महाकुंभचा राजकीय व्यापार चालवला आहे. मार्केटिंग करून लोकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे.”
सरकारकडून चेंगराचेंगरीचा आकडा दाबण्याचा प्रयत्न
“दिल्लीतील चेंगराचेंगरीचा सरकार आकडा दाबण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या चार दिवसांपासून दिल्ली स्थानकावर प्रयागराजला जाण्यासाठी गर्दी करत आहेत. मध्यप्रदेशमधून किंवा उत्तर प्रदेशमधून प्रचंड प्रमाणात लोक येत आहेत. प्रवाशी रेल्वे गाडीच्या काचा फोडून, दरवाजे तोडून लोक आतमध्ये जात आहे. इतकी गर्दी अनावर झाली आणि सरकार काय करतयं?,” असा आरोप संजय राऊत यांनी केला. Sanjay Raut |
हेही वाचा :
बापू आंधळे प्रकरण ! फरार बबन गित्तेच्या संपत्तीवर टाच? ; पोलिसांकडून हालचालींना वेग