लोणंद: भरधाव डंपरची दुचाकी, ट्रकला धडक
Updated On:

लोणंद – नीरा-सातारा रोडवर जय तुळजाभवानी स्टील व फर्निचर दुकानासमोर डंपरने मोटारसायकलला उडवून रस्त्याकडेला उभा असणाऱ्या ट्रकला जोराची धडक दिली. यात दुचाकीस्वार जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले. या अपघाताची नोंद लोणंद पोलिसांत रात्री उशिरापर्यंत करण्याचे काम चालू होते.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, नीरा- सातारा रोडवर जय तुळजाभवानी स्टील व फर्निचर दुकानासमोर शुक्रवारी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास नीरा बाजूकडून लोणंद बाजूकडे चाललेल्या डंपरने लोणंदकडे जाणाऱ्या दुचाकीला पाठीमागून धडक देऊन रस्त्याकडेला उभा असणाऱ्या ट्रक ला जोराची धडक दिली. यात दुचाकीस्वार जखमी झाले. डंपरच्या चालकाने मद्यपान केलेले असल्याचे घटनास्थळावरील लोकांचे म्हणणे आहे. घटनेची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.





