लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला होणार ‘राजस्थान’चे मुख्यमंत्री ?

जयपूर – राजस्थानमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आली आहे, मात्र मुख्यमंत्री चेहऱ्याबाबत भाजपमध्ये अजूनही संभ्रम आहे.
मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराबाबत माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, अर्जुन राम मेघवाल, गजेंद्र सिंह शेखावत, राजेंद्र राठोड ते दीयाकुमारीपर्यंतच्या नावांचा उल्लेख करण्यात आला होता. आता या शर्यतीत लोकसभेचे विद्यमान अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या नावाचीही एंट्री झाली आहे.
ओम बिर्ला, राजस्थानमधील हाडोटी येथील भाजपचा एक प्रमुख चेहरा आहेत. त्यांचा कार्यकाळ येत्या मे महिन्यात संपत आहे. अशा परिस्थितीत त्यांची पुढची भूमिका राजस्थानमध्येच असेल. यावेळी तिकीट वाटपात त्यांनी घेतलेली भूमिका पाहता ते राजस्थानच्या राजकारणात स्वत:साठी महत्त्वाच्या भूमिकेच्या शोधात असल्याचे मानले जात आहे.
सायंकाळी चार वाजेपर्यंत असा होता निकाल –
भाजप – 114
काॅंग्रेस – 70
इतर – 15
एकूण जागा – 199





