Lok Sabha Result 2024 : ‘अयोध्यावासियांसाठी ‘ही’ लाजिरवाणी गोष्ट..’; सोनू निगमच ट्विट चर्चेत

Sonu Nigam | Ayodhya | Lok Sabha Result 2024 – केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार बनताना दिसत असले तरी भाजपला यावेळी अत्यंत कमकुवत अशा प्रकारचा जनादेश मिळाला आहे. अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा पक्षाने अत्यंत जोरकसपणे निवडणुकीत लावून धरला होता.
प्रभू रामाच्या नावावर मतेही मागण्यात आली होती. हे मंदिर आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा गेमचेंजर ठरेल अशी भाजपला अपेक्षा होती. प्रत्यक्षात तसे काही झाले नसल्याचे किमान उत्तर प्रदेशच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे.
प्रतिष्ठापना सोहळा जानेवारी महिन्यातच झाला होता. उत्तर प्रदेशच्या सर्वच्या सर्व ८० जागा पटकावू असा विश्वास भाजपने व्यक्त केला होता. तथापि, अयोध्येला अगदी लागूनच असलेल्या फैजाबाद येथून भाजपचे विद्यमान खासदार लल्लू सिंह समाजवादी पक्षाच्या उमेदवारापेक्षा चाळीस हजार मतांनी पिछाडीवर होते.
सपाने येथे मागासवर्ग कार्ड खेळत अवधेश प्रसाद यांना रिंगणात उतरवले होते अयोध्येचा सातत्याने राम नगरी असा उल्लेख करणारे लल्लू सिंह यांनी त्यांनी मात दिली. केवळ एवढेच नाही तर जवळच असलेल्या सुलतानपूर मतदार संघातील भाजपच्या उमेदवार आणि माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधीही पिछाडीवर होत्या.
अखेरचा आकडा हाती आला तेंव्हा समाजवादी पक्षाचे उमेदवार राम भुअल निषाद यांनी मनेका यांच्यावर ३४ हजारांची आघाडी घेतली होती. आंबेडकर नगरची जागाही भाजपला गमवावी लागली. समाजवादी पक्षाचे उमेदवार लालजी वर्मा यांनी भाजप उमेदवार रितेश पांडे यांच्यावर एक लाखापेक्षा जास्त मतांची आघाडी घेतली होती.
दरम्यान, अयोध्येतील या निकालासंबंधित गायक सोनू निगमने एक पोस्ट शेअर केलेली आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, “ज्या सरकारने संपूर्ण अयोध्येचा कायापालट केला म्हणजेच नवीन विमानतळ दिलं,
जिस सरकार ने पूरे अयोध्या को चमका दिया, नया एयरपोर्ट दिया, रेलवे स्टेशन दिया, 500 सालों के बाद राम मंदिर बनवाकर दिया, पूरी की पूरी एक टेंपल इकोनॉमी बनाकर दी उस पार्टी को अयोध्या जी सीट पर संघर्ष करना पड़ रहा है।
शर्मनाक है अयोध्यावासियों!
— Sonu Nigam (@SonuNigamSingh) June 4, 2024
रेल्वे स्टेशन दिलं, 500 वर्षांनंतर राम मंदिर बांधलं, या मंदिराची अर्थव्यवस्था करणाऱ्या भाजपा पक्षाला अयोध्येच्या जागेवर संघर्ष करावा लागतोय. अयोध्यावासियांसाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे…” असं त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय.





