‘मला लोखंडी रॉडने मारलं अन्…’वर्ध्याचे भाजपा उमेदवार रामदास तडस यांच्यावर सूनेचे गंभीर आरोप

Lok Sabha Election 2024 । भाजप पक्षाने वर्धा मतदार संघातून भाजप नेते रामदास तडस यांना उमेदवारी दिली. येत्या २० तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी रामदास तडस यांच्यासाठी वर्ध्यात सभा घेणार आहे. मात्र, त्याआधी रामदास तडस यांना धक्का बसला आहे. रामदास तडस यांची सून पूजा तडस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले आहे.
आज ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यासोबत पूजा तडस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी सुषमा अंधारे आणि पूजा तडस यांनी सासरे आणि भाजप नेते रामदास तडस यांच्यावर गंभीर आरोप लावले.
नेमक काय म्हणाल्या सुषमा अंधारे
‘कारवाई टाळण्यासाठी म्हणून रामदास तडस यांच्या मुलाने पूजा तडसशी विवाह केला. पुढे त्या मुलीच काय झालं? मोदीच्या उमेदवाराने, मोदीजींचा परिवार संभाळला का? कारवाईच्या भीतीने फक्त लग्न केलं. पत्नीला फ्लॅटवर नेऊन ठेवलं. पुढे तिची काय अवस्था झाली, ते पाहिलं नाही. तो फ्लॅट विकला, तिला बाहेर काढलं” असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला.
पूजा तडसने सासरे रामदास तडस यांच्यावर लगावले गंभीर आरोप
‘स्वत:च्या मुलाला बलात्काराच्या आरोपातून वाचवण्यासाठी माझ्याशी लग्न लावून दिलं. मला फ्लॅटवर नेऊन टाकलं. उपभोगण्याची वस्तू म्हणून माझा तिथे वापर झाला. त्यातून या बाळाचा जन्म झाला. बाळाच्या जन्मल्यानंतर डीएनए कर म्हणून आरोप झाले’ असं दु:ख पूजा तडस यांनी मांडलं.
पूजा तडस पुढे म्हणाल्या,’खासदार म्हणतात डीएनए टेस्ट कर, तेव्हा समाजातल्या माझ्यासारख्या मुलींनी जायच कुठे? प्रत्येकवेळी अपमानास्पद वागणूक दिली. घरी गेली, तेव्हा लोखंडी रॉडने मारहाण केली. फ्लॅट विकला. मुलाला बेदखल केलं म्हणता, मग त्याला घरात का ठेवलय? असा सवालही पूजा तडस यांनी केला आहे.
काँग्रेसवर नाराजीनंतर वर्षा गायकवाड म्हणाल्या,’जो उमेदवार जिंकणार आहे, त्याला तिकीट द्यावे’





