‘शाहू महाराजांविरुद्ध 2 लाख 70 हजारापेक्षा जास्त लीडने जिंकणार’ संजय मंडलिकांना विश्वास

Lok Sabha Election 2024 । कोल्हापूर लोकसभेला करवीर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज निवडणुकीच्या रिंगणात आहे. शाहू महाराज यांनी कोल्हापूरची उमेदवारी घ्यावी यासाठी महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांकडून साद घालण्यात आली होती.
आजवरची घराण्याची परंपरा आणि पुरोगामी वसा लक्षात घेत शाहू महाराजांनी काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. तर महायुतीकडून संजय मंडलिक यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
दरम्यान, आज कोल्हापुरातील दोन्ही उमेदवारांच्या अर्ज करणार आहे. अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक उपस्थित राहणार आहे. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणूक जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
‘उमेदवारी अर्ज भरण्याच्या माध्यमातून जोरदार शक्तीप्रदर्शन महायुतीकडून केलं जाणार आहे. दरम्यान, कोल्हापूरचे उमेदवार संजय मंडलिक यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये दोन लाख 70 हजारांनी विजयी झालो झालो होतो, असे सांगत कदाचित मी हे लीड ओलांडून विजयी होईल, असा विश्वास व्यक्त केला.
तत्पूर्वी संजय मंडलिक यांची कोल्हापुरच्या चंदगड तालुक्यातील नेसरी येथे प्रचारसभा पार पडली होती. या सभेत बोलताना संजय मंडलिक यांनी शाहू महाराज छत्रपती हे खरे वारसदार आहेत का? असा सवाल उपस्थित करत धक्कादयक विधान केले होत. “या मल्लाला हातच लावायचा नाही. मल्लाला टांगच मारायचे नाही मग ती कुस्ती कशी होणार? अशात गादीचा अपमान झाला की काय, असा कांगावा केला जातो. यानिमित्ताने सांगितले पाहिजे की आत्ताचे महाराज साहेब आहेत हे कोल्हापूरचे आहेत का? वारसदार खरे आहेत का? ते सुद्धा दत्तकच आलेले आहेत. त्यामुळे कोल्हापूरची जनताच खरी वारसदार,” असे संजय मंडलिक यावेळी म्हणाले होते.
हे वाचले का ? जगातील सर्वात वयोवृद्ध गोरिल्लाने साजरा केला 67 वा वाढदिवस, एकट्याने खाल्ला केक, व्हिडिओ पाहाच





