पुण्यात लॉकडाऊनचा फज्जा
Updated On:

पुणे – लॉकडाऊनची शिथिलता विभागीय आयुक्तांनी रद्द केली असून, आजपासून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केली जात आहे. नागरिकांनी पूर्ण सहकार्य केल्यास करोना विषाणूची साखळी तोडण्यास मदत होईल, अशी प्रशासनाची अपेक्षा आहे. मात्र, पहिल्याच दिवशी संचेती हॉस्पिटल चौकात वाहनांची मोठी गर्दी झाली असल्याने लॉकडाऊनचा फज्जा उडाला आहे.





