लॉकडाऊन काय तुमच्या बापाची इस्टेट आहे का? खासदार उदयनराजेंचे भीक मागो आंदोलन

Updated On:

सातारा  – खासदार उदयनराजे भोसले यांनी शनिवारी लॉकडाऊनच्या धोरणाचा निषेध करत पोवई नाक्यावर भीक मागो आंदोलन केले . या आंदोलना दरम्यान जमा झालेली 450 रुपयांची भीक त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केली . राज्यशासनाने लॉक डाऊनच्या धोरणाचा पुन्हा विचार करावा अशी मागणी उदयनराजे यांनी केली .

शासनाच्या लॉकडाउन विरोधात खासदार उदयनराजे भोसले यांनी आज दुपारी पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करत त्यासमोरील आंब्याच्या झाडाखाली पोतं टाकून पथारी मांडली . समोर थाळी ठेवून भीक मागो आंदोलनास प्रारंभ केला. यावेळी उदयनराजे यांनी सचिन वाझे प्रकरणासह इतर सर्वच विषयांवर राज्य सरकारवर प्रतिक्रिया देताना सडकून टीका केली .

करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने जाहीर केलेल्या दोन दिवसीय पूर्ण लॉकडाउनला साताऱ्यात शनिवारपासून सुरुवात झाली. आज पहिल्याच दिवशी लॉकडाउनला जिल्ह्याच्या विविध भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अत्यावश्‍यक सेवा सोडून इतर सर्व व्यवहार, वाहतूक व्यवस्था बंद राहिल्याने सर्वत्र सामसुम दिसत होती. मात्र, या लॉकडाउनला साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी तीव्र विरोध केला . हा विरोध त्यांनी थेट कृतीत आणला . येथील पोवई नाक्यावर त्यांनी हातात थाळी घेऊन प्रशासनाने पुकारलेल्या लॉकडाउनचा निषेध केला. त्यानंतर उदयनराजेंनी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत फेरफटका मारत शासनाच्या कारभाराचा तीव्र निषेध व्यक्त केला.

या आंदोलनामुळे साताऱ्यातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. भीक मागो आंदोलन करत जमा केलेले 450 रुपये घेऊन उदयनराजे यांनी चालत जिल्हाधिकारी कार्यालय गाठत ती रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रतिनिधीकडे जमा केली. गोरगरीब जनतेच्या पाठीशी मी कायम उभा राहणार असून राज्य शासनाने वीकेंड लाकडाउनचा पूनर्विचार करावा, असेही उदयनराजेंनी शेवटी स्पष्ट केले.

आणखी संबंधित बातम्या

Covid-19: देशात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले? जुलैमध्ये 339 नवे रुग्ण; तज्ज्ञ म्हणतात, घाबरण्याची गरज नाही

2026-07-18 14:20:54

Covid-19: देशात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले? जुलैमध्ये 339 नवे रुग्ण; तज्ज्ञ म्हणतात, घाबरण्याची गरज नाही

Jaan Kumar Sanu: देशात पुन्हा वाढतायत कोविड-19 रुग्ण; 'बिग बॉस 14'चा स्पर्धकही कोरोना पॉझिटिव्ह, मास्क पुन्हा आवश्यक ठरणार?

2026-07-14 10:38:46

Jaan Kumar Sanu: देशात पुन्हा वाढतायत कोविड-19 रुग्ण; 'बिग बॉस 14'चा स्पर्धकही कोरोना पॉझिटिव्ह, मास्क पुन्हा आवश्यक ठरणार?

Alert: कोरोना गेला, पण आता 'ही' समस्या भारतात गंभीर आरोग्य संकट म्हणून उदयास येतेय, डॉक्टरांनी दिला इशारा

2025-12-26 18:53:40

Alert: कोरोना गेला, पण आता 'ही' समस्या भारतात गंभीर आरोग्य संकट म्हणून उदयास येतेय, डॉक्टरांनी दिला इशारा

दबक्या पावलांनी आला ! देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ४३०२ वर पोहोचली ; आतापर्यंत ४४ जणांचा मृत्यू

2025-06-04 12:25:22

दबक्या पावलांनी आला ! देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ४३०२ वर पोहोचली ; आतापर्यंत ४४ जणांचा मृत्यू

कोरोनाची पुन्हा धास्ती ! मृतांचा आकडा २८ वर ; सक्रिय रुग्ण ४००० च्या जवळ

2025-06-02 10:54:29

कोरोनाची पुन्हा धास्ती ! मृतांचा आकडा २८ वर ; सक्रिय रुग्ण ४००० च्या जवळ