मुंबई – करोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरातील लोकल ट्रेन बंद ठेवण्यात आल्या आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या आता कमी होताना दिसून येत आहे. राज्यातील ईतर सेवा हळूहळू सुरु करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना प्रतीक्षा आहे ती लोकल प्रवासाला कधी परवानगी मिळणार याची. याबाबत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी संकेत दिले आहेत. लोकल ट्रेन मध्ये लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या प्रवाशांना मुभा दिली जाऊ शकते, असे संकेत आदित्य ठाकरे यांनी दिले आहेत तसेच .रेल्वेबाबत दोन- तीन आठवडे चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.करोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांना केवळ लोकल ट्रेनमध्येच नव्हे, इतर ठिकाणीही कशा प्रकारे सूट देता येईल का, यावरही चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आदित्य ठाकरे म्हणाले की, निर्बंध शिथिल करताना काही बाबतीत अधिक जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. अमेरिका, इंग्लंड या देशात लसीकरण बऱयाच प्रमाणात झाले आहे, तरीही तिथे रुग्ण वाढत आहेत. सरकार सर्वसामान्यांच्या जिवाची काळजी घेत आहे.