Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिर रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापणा आज 22 जानेवारी रोजी होत आहे. यानिमित्त देशभरात आनंदाचे वातावरण आहे. अवघ्या काही तासांवर हा ऐतिहासिक सोहळा येऊन ठेपला आहे. मात्र त्यापूर्वीच भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी राम मंदिरातील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर आली आहे. शेवटच्या क्षणी त्यांनी अयोध्येला जाणे रद्द केले असून त्यामागचे कारण देखील सांगण्यात आले आहे.
लालकृष्ण अडवाणी हे राम मंदिर आंदोलनातील प्रमुख चेहरा होते. त्यासाठी त्यांनी देशभर रथयात्रा काढली होती खराब वातावरण आणि थंडीमुळे हा दौरा रद्द केला आहे. ९६ वर्षीय अडवाणी यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी कृष्ण गोपाल, राम लाल आणि विहिंपचे आलोक कुमार यांनी लालकृष्ण अडवाणी यांच्या घरी जाऊन प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आमंत्रित केले होते. त्यामुळे ते सोहळ्याला उपस्थित राहतील अशी आशा होती.
तर यापूर्वी राम मंदिर ट्रस्टने म्हटले होते की, मुरली मनोहर जोशी आणि अडवाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले होते. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिरात रामलल्लाचा अभिषेक सोहळा पार पडणार आहेत. राम मंदिरासह संपूर्ण अयोध्या नगरी यासाठी सजवण्यात आली आहे. देअयोध्येतील राम मंदिरासाठी जवळपास मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेला लढा अखेर संपणार आहे.
प्राणप्रतिष्ठेसाठी 84 सेकंदांचा शुभ मुहूर्त
आज 22 जानेवारी 2024 रोजी सकाळी 12.29 ते 12:30 पर्यंत राम मंदिरात रामलल्लाची मूर्ती स्थापन करण्याची वेळ असेल. प्राणप्रतिष्ठेसाठी केवळ 84 सेकंदांचा शुभ मुहूर्त असणार आहे. या क्षणाची सर्वचजण आतुरतेने वाट पाहत आहे.