पहिल्या उपांत्य फेरीत लिव्हरपूलचा विजय

लंडन – रोपीयन फुटबॉल लीगमधील मानाच्या चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत लिव्हरपूलने अंतिम फेरीत स्थान मिळवण्याच्या वाटचालीत भक्कम यश मिळवले. उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात लिव्हरपूलने व्हिलारेयालला 2-0 अशा फरकाने पराभूत केले.
सहा वेळा युरोपीयन स्पर्धा विजेत्या लिव्हरपूलने व्हिलारेयालवर सहज मात केली. पहिला हाफ गोलशून्य बरोबरीत सुटल्यानंतर दुसऱ्या हाफमध्ये लिव्हरपूलच्या खेळाडूंनी आक्रमक खेळ केला.
सामन्याच्या 53 व्या मिनिटाला व्हिलारेयालकडून बचावात ढिसाळपणा आला व जॉर्डन हेंडरसनच्या क्रॉसवर पेर्विस एस्टुपिनानकडून स्वयंगोल झाल्याने लिव्हरपूलला आघाडी मिळाली. यानंतर दोन मिनिटांनी सादियो मानेने महंमद सलाहच्या पासवर व्हिलारेयालच्या गोलरक्षक जेरोनिमो रुलीला चकवत गोल केला व लिव्हरपूलची आघाडी 2-0 अशी केली. यानंतर व्हिलारेयालने सामना वाचवण्यासाठी प्रयत्न केले, पण लिव्हरपूलच्या बचाव फळीने त्यांना कोणतीही संधी दिली नाही.




