#Live: दहिसर मध्ये राज ठाकरेंची तोफ धडाडली

मुंबई – राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे जोरदार वाहत असून, उमेदवारांच्या प्रचारासाठी सर्वच पक्षानी कंबर कसली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मनसे अध्यक्ष राज ठाकरे ह्यांच्या जाहीर आज सभेचं दहिसर मध्ये आयोजन करण्यात आले आहे.

राज ठाकरे यांच्या सभेतील ठळक मुद्दे – 

  • महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे दाद मागितली तर न्याय मिळतोच म्हणून लोकं आमच्याकडे कुठलाही नागरी प्रश्न अडला तर येतात आणि आम्ही आंदोलनं करतो आणि न्याय मिळवून देतो.
  • २०१४ च्या जाहीरनाम्यात सांगतात की, सहकाराला बळकट करण्यासाठी आणि ह्या व्यवस्थेतील भ्रष्टाचार दूर करण्यासाठी विशेष कायदा आणू असं भाजप म्हणाले आणि जी पीएमसी बँक बुडली त्यावर भाजपचे नेते आहेत आणि सिटी कॉऑप बँकेवर शिवसेनेचे नेते. आणि हे गप्पा मारतात भ्रष्टाचार दूर करण्याच्या
  • More
    रिझर्व्ह बँकेकडून सरकार पैसे काढून घेऊ शकतो पण लोकं त्यांच्या हक्काच्या ठेवी बँकेतून काढून घेऊ शकत नाहीत, हा काय प्रकार आहे? लोकांकडे शिक्षणाला, त्यांच्या मुलांच्या लग्नाला, आजारपणाला पैसे नाहीत… ह्या असल्या गोष्टींसाठी सरकार ह्यांच्या हातात द्यायची?
  • आज जी मुलं-मुली कॉलेजला आहेत त्याना पुढे शिक्षण झाल्यावर नोकऱ्या मिळण्याची शाश्वती नाही, ह्यासाठी तुम्ही मतदान करता असल्या नालायक लोकांना

 

Leave A Reply

Your email address will not be published.