\n

183 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना फिल सॉल्ट आणि सुनील नरेन यांनी कोलकाताला दमदार सुरुवात करून दिली. आरसीबीच्या गोलंदाजांवर निशाणा साधत दोघांनी पहिल्या विकेटसाठी 86 धावांची भागीदारी केली. सातव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर मयंक डागरने ही भागीदारी मोडली. नरेन 22 चेंडूत 47 धावा करून बाद झाला. त्याने 213.63 च्या स्ट्राईक रेटने दोन चौकार आणि पाच षटकार मारले. त्याचवेळी फिलिप सॉल्टने दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 30 धावा काढल्या.

\n

या सामन्यात व्यंकटेश अय्यर आणि श्रेयस अय्यर यांच्यात चांगली भागीदारी झाली. संघाला तिसरा धक्का व्यंकटेशच्या रूपाने बसला. 29 चेंडूत अर्धशतक झळकावून तो पॅव्हेलियनमध्ये परतला. 16व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर यश दयालने या फलंदाजाला आपला बळी बनवले. त्याने कर्णधारासोबत 75 धावांची भागीदारी केली.

\n

रिंकू सिंग पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि पाच धावा करून नाबाद राहिला. तर श्रेयस अय्यरने षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला. त्याने आरसीबीविरुद्ध 24 चेंडूंचा सामना केला आणि 162.50 च्या स्ट्राइक रेटने 39 धावा केल्या. या काळात तो नाबाद राहिला.

\n

तत्पूर्वी,  केकेआरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 20 षटकांत 6 गडी गमावून 182 धावा केल्या. आरसीबीसाठी किंग कोहलीने 59 चेंडूत 83 धावांची नाबाद खेळी केली. त्याच्या बॅटमधून 4 चौकार आणि 4 षटकार आले. दिनेश कार्तिकही शेवटी चमकला. कार्तिकने अवघ्या 8 चेंडूत तीन षटकारांच्या मदतीने 20 धावा केल्या. केकेआरचा मिचेल स्टार्क पुन्हा एकदा चांगलाच महागडा ठरला. स्टार्कने चार षटकात एकही विकेट न घेता 47 धावा दिल्या.

\n

रिंकू सिंग पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि पाच धावा करून नाबाद राहिला. तर श्रेयस अय्यरने षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला. त्याने आरसीबीविरुद्ध 24 चेंडूंचा सामना केला आणि 162.50 च्या स्ट्राइक रेटने 39 धावा केल्या. या काळात तो नाबाद राहिला.

\n
\n

Innings Break‼️

\n

A Virat Kohli masterclass propels #RCB to 182/6 🙌

\n

Will #KKR chase it down? 🤔

\n

Match Updates ▶️ https://t.co/CJLmcs7aNa #TATAIPL | #RCBvKKR pic.twitter.com/J0a7geIo52

\n

— IndianPremierLeague (@IPL) March 29, 2024

\n

\n

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलेल्या आरसीबीची सुरुवात खराब झाली कारण दुसऱ्याच षटकात त्यांनी कर्णधार फाफ डू प्लेसिसची पहिली विकेट गमावली. डू प्लेसिस 1 षटकाराच्या मदतीने केवळ 08 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी कोहली आणि कॅमेरून ग्रीन यांनी 65 धावांची (42 चेंडू) भागीदारी केली, ज्याच्या मदतीने संघाने 80 धावांचा टप्पा ओलांडला. 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 33 धावा (21 चेंडू) केल्यानंतर 9व्या षटकात पॅव्हेलियनमध्ये परतलेल्या ग्रीनच्या रूपाने संघाने दुसरी विकेट गमावली.

\n

https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/kolkatas-star-spinner-sunil-narine-has-made-a-big-record-in-his-name-as-soon-as-he-entered-the-field/

\n

त्यानंतर कोहलीने मॅक्सवेलसह तिसऱ्या विकेटसाठी 42 धावांची (31 चेंडू) भागीदारी केली. ही भागीदारी 15 व्या षटकात संपुष्टात आली जेव्हा सुनील नरेनने मॅक्सवेलला आपला शिकार बनवले. मॅक्सवेलने 19 चेंडूंत 3 चौकार आणि 1 षटकारासह 28 धावा केल्या. यानंतर 17व्या षटकात रजत पाटीदार (03) स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर 18व्या षटकात हर्षित राणाने अनुज रावतला (03) स्लोअर चेंडूवर पायचीत केले. 151 धावांवर आरसीबीने पाचवी विकेट गमावली. यानंतर कोहली आणि दिनेश कार्तिक यांनी सहाव्या विकेटसाठी 31 (15 चेंडू) धावांची भागीदारी केली. कार्तिकने 8 षटकात 3 षटकारांच्या मदतीने 20 धावा केल्या. कोहलीने 59 चेंडूत 83 धावांची नाबाद खेळी केली. त्याच्या बॅटमधून 4 चौकार आणि 4 षटकार आले.

\n

हर्षित राणा आणि आंद्रे रसेल यांनी सर्वाधिक 2-2 विकेट घेतल्या. यादरम्यान हर्षितने 4 षटकात 39 धावा दिल्या. याशिवाय किफायतशीर असलेल्या रसेलने 4 षटकांत 29 धावा दिल्या. एक यश सुनील नरेनने 4 षटकात 40 धावा देत मिळवले. आयपीएलचा सर्वात महागडा खेळाडू मिचेल स्टार्कला चांगलाच फटका बसला. स्टार्कने 4 षटकात 47 धावा दिल्या.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"IPL 2024 (#RCBvsKKR Match 10) : कोलकाताचा ‘रॉयल’ विजय, आरसीबीचा 7 गडी राखून केला दारूण पराभव….","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/03/kkr.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/swapnilhajareeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/live-cricket-score-rcb-vs-kkr-indian-premier-league-2024-kkr-beat-rcb-by-seven-wickets#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/03/kkr.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/live-cricket-score-rcb-vs-kkr-indian-premier-league-2024-kkr-beat-rcb-by-seven-wickets#webpage","name":"IPL 2024 (#RCBvsKKR Match 10) : कोलकाताचा ‘रॉयल’ विजय, आरसीबीचा 7 गडी राखून केला दारूण पराभव….","url":"https://www.dainikprabhat.com/live-cricket-score-rcb-vs-kkr-indian-premier-league-2024-kkr-beat-rcb-by-seven-wickets","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/live-cricket-score-rcb-vs-kkr-indian-premier-league-2024-kkr-beat-rcb-by-seven-wickets#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/03/kkr.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/live-cricket-score-rcb-vs-kkr-indian-premier-league-2024-kkr-beat-rcb-by-seven-wickets#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/live-cricket-score-rcb-vs-kkr-indian-premier-league-2024-kkr-beat-rcb-by-seven-wickets","name":"IPL 2024 (#RCBvsKKR Match 10) : कोलकाताचा ‘रॉयल’ विजय, आरसीबीचा 7 गडी राखून केला दारूण पराभव…."}}]}}}

IPL 2024 (#RCBvsKKR Match 10) : कोलकाताचा ‘रॉयल’ विजय, आरसीबीचा 7 गडी राखून केला दारूण पराभव….