‘सातारचा सलमान’ चित्रपटातील ‘हे’ तुफान सॉंग एकदा ऐकाच
Updated On:

मुंबई – मराठी सिनेरसिकांसाठी लवकरच ‘सातारचा सलमान’ हा तुफान चित्रपट भेटीला येणार आहे. नुकतंच या चित्रपटातील हळदीचं धमाकेदार गाणं प्रदर्शित झालं असून, या गाण्याला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे. हे गाणं धमाल आणि मस्तीने पुरेपूर असे पार्टी सॉंग आहे.
अभिनेत्री नेहा महाजन आणि अभिनेता अनिकेत विश्वासराव आणि हेमंत ढोमे यांच्यावर हे गाणं चित्रित करण्यात आलं आहे. ‘सातारचा सलमान’ हा चित्रपट येत्या 11 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.





