Lionel Messi : लिओनेल मेस्सीचे हैदराबादमध्ये धमाकेदार आगमन! सीएम रेवंत रेड्डीसोबत गाजवले मैदान, पाहा VIDEO

Lionel Messi play with football CM Revanth Reddy : महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी तीन दिवसीय ‘गोट इंडिया टूर’साठी भारतात दाखल झाला आहे. १३ डिसेंबर रोजी कोलकात्यातील सॉल्ट लेक स्टेडियमवर त्याच्या आगमनाने या दौऱ्याची सुरुवात झाली. सकाळी कोलकाता येथे मेस्सीने चाहत्यांशी संवाद साधला, मात्र तेथून लवकर निघाल्याने काही चाहते निराश झाले असले तरी, त्याच्या भारत आगमनाचा उत्साह सर्वत्र दिसून आला. हैदराबादमध्ये त्याने मुख्यमंत्र्यासोबत सामना खेळला.
हैदराबादमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत खास सामना –
१३ डिसेंबरच्या संध्याकाळी लिओनेल मेस्सी हैदराबाद येथे पोहोचला. तेथे राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये त्याने तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांच्यासोबत फुटबॉल खेळून चाहत्यांना आनंद दिला. स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या हजारो फुटबॉलप्रेमींनी या अनोख्या क्षणाचा अनुभव घेतला. मेस्सी आणि मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी गोलपोस्टमध्ये सहजपणे चेंडू मारून उपस्थितांना रोमांचित केले.
मुलांसोबत ‘फ्रेंडली मॅच’मध्ये सहभाग –
VIDEO | Hyderabad: Argentine football icon Lionel Messi graces the field at Rajiv Gandhi International Cricket Stadium and plays football with Telangana CM Revanth Reddy.
(Source: Third Party)#MessiInIndia #Hyderabad #Telangana pic.twitter.com/O4DZ0OcIhC
— Press Trust of India (@PTI_News) December 13, 2025
मेस्सीसोबत या ‘गोट इंडिया टूर’मध्ये त्याचे सहकारी लुईस सुआरेझ आणि रॉड्रिगो डी पॉल हे देखील सहभागी झाले आहेत. हैदराबादमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या ‘फ्रेंडली मॅच’मध्ये लहान मुलांनी सहभाग घेतला. यावेळी मेस्सी आणि मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी मुलांच्या संघांसोबत एकत्र सामना केला. मेस्सीने स्टेडियममधील चाहत्यांना अभिवादन करत अनेकदा त्यांच्या दिशेने चेंडू मारला, ज्यामुळे उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
मुंबई आणि दिल्लीत पुढील कार्यक्रम –
Welcomed Him
Made Him To Play With Kids
Promoted Football in TelanganaBranded Hyderabad With Messi
Revanth Strategy 🤌✅👌#MessiInIndia#RevanthReddy #Hyderabadpic.twitter.com/y64rY93rJh
— Yashin Tweets (@Yashinzayn) December 13, 2025
हैदराबादमधील कार्यक्रम आटोपल्यानंतर १४ डिसेंबर रोजी लिओनेल मेस्सी मुंबईत दाखल होईल. येथे एका सेलिब्रिटी फुटबॉल सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यात भारतीय क्रिकेट संघातील काही मोठे स्टार खेळाडू आणि बॉलिवूडमधील तारे सहभागी होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – IPL 2026 Auction पूर्वी CSK च्या माजी खेळाडूला मोठा धक्का! बॉलिंग ॲक्शनवर गंभीर प्रश्न उपस्थित
मेस्सीच्या या ‘गोट इंडिया टूर’चा समारोप १५ डिसेंबर रोजी दिल्लीत होणार आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये आयोजित कार्यक्रमात मेस्सी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार आहे. या तीन दिवसीय दौऱ्यात मेसीने केवळ चाहत्यांची मने जिंकणार नाही, तर देशातील क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील व्यक्तींसोबत फुटबॉलचा आनंदही घेईल.





