Lionel Messi : लिओनेल मेस्सी का झाला भावूक? सामन्यादरम्यान डोळ्यांत दिसले अश्रू, VIDEO होतोय व्हायरल

Lionel Messi Emotional Video Viral : फुटबॉल विश्वातील सर्वात मोठा सुपरस्टार लिओनेल मेस्सी याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये तो वर्ल्ड कप पात्रता फेरीच्या सामन्यादरम्यान अतिशय भावूक झालेला दिसत आहे. अर्जेंटिना आणि व्हेनेझुएला यांच्यात ब्युनस आयर्स येथील मोनुमेंटल स्टेडियममध्ये झालेला हा सामना कदाचित मेस्सीचा घरच्या मैदानावरील शेवटचा सामना ठरला, ज्यामुळे तो भावनावश झाला. या सामन्यात अर्जेंटिनाने 3-0 असा एकतर्फी विजय मिळवला.
कुटुंबासह स्टेडियममध्ये दाखल झाला मेस्सी –
लिओनेल मेस्सी आपल्या कुटुंबासह व्हेनेझुएलाविरुद्धच्या सामन्यासाठी मोनुमेंटल स्टेडियममध्ये दाखल झाला. स्टेडियममध्ये प्रवेश करताच 80,000 हून अधिक चाहत्यांनी उभे राहून त्याचे स्वागत केले. यावेळी मेस्सीच्या डोळ्यांत अश्रू दिसले.
I don’t want to know how I will handle in his very last game because I am in tears now for his last Argentina home game. I keep having flashbacks to 2006 when I first saw his Argentina debut at the World Cup…🥹
pic.twitter.com/u8ccVJmc6S— Messi Fanatic (@MessiFanatic_) September 4, 2025
सामन्यापूर्वी अॅपल टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत मेस्सी म्हणाला, “हा सामना माझ्यासाठी खूप खास आहे, कारण ही पात्रता फेरीतील शेवटची लढत आहे. यानंतर मैत्रीपूर्ण सामने होतील की अन्य सामने, हे मला माहीत नाही. त्यामुळे माझे कुटुंब माझ्यासोबत आहे, कारण पुढे काय होईल, हे मला ठाऊक नाही.”
हेही वाचा – PKL 2025 : पुणेरी पलटनला सचिनची ‘ती’ चूक पडली महागात, दबंग दिल्लीने गोल्डन रेडमध्ये मारली बाजी, पाहा VIDEO
मेस्सीच्या दोन गोलांनी अर्जेंटिनाला विजयी –
अर्जेंटिनासाठी हा सामना पात्रतेपेक्षा अधिक महत्त्वाचा होता, कारण त्यांनी 2026 मध्ये होणाऱ्या फुटबॉल वर्ल्ड कपसाठी आधीच आपली जागा निश्चित केली आहे. व्हेनेझुएलाविरुद्धच्या सामन्यात मेस्सीने घरच्या चाहत्यांसमोर दोन गोल करत आपली छाप पाडली. त्याने पहिला गोल 39व्या मिनिटाला, तर दुसरा गोल 80व्या मिनिटाला केला. या दोन गोलांच्या बळावर अर्जेंटिनाने 3-0 असा दणदणीत विजय मिळवला. 2026 चा फुटबॉल वर्ल्ड कप युनायटेड स्टेट्स, कॅनडा आणि मेक्सिको यांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणार आहे.





