Messi Fights Referee : “माझ्याशी नीट बोल…!” फिफा विश्वचषकात रेफ्रींवर संतापला मेस्सी; मैदानावरील राड्याचा VIDEO व्हायरल
Messi Fights Referee : अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सी आणि पोर्तुगीज रेफ्री जोआओ पेड्रो पिन्हेरो यांच्यात मैदानावर झालेल्या राड्याची होत आहे.

Lionel Messi Referee Joao Pinheiro Fight in Argentina vs Switzerland Match : फिफा फुटबॉल विश्वचषक २०२६ मध्ये गतविजेत्या अर्जेंटिना आणि स्वित्झर्लंड यांच्यातील बाद फेरीचा सामना केवळ मैदानी खेळामुळेच नाही, तर खेळाडूंच्या हाय-व्होल्टेज ड्राम्यामुळे ऐतिहासिक ठरला. निर्धारित ९० मिनिटांच्या खेळात दोन्ही संघ १-१ अशा बरोबरीत होते, मात्र एक्स्ट्रा टाईममध्ये अर्जेंटिनाने लागोपाठ दोन गोल डागत हा सामना ३-१ ने आपल्या खिशात घातला आणि क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. परंतु, या सामन्यातील विजयापेक्षाही जास्त चर्चा अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सी आणि पोर्तुगीज रेफ्री जोआओ पेड्रो पिन्हेरो यांच्यात मैदानावर झालेल्या राड्याची होत आहे.
रेफ्रीच्या टोनवर मेस्सी संतापला; भर मैदानात सुनावले खडेबोल –
यंदाच्या संपूर्ण स्पर्धेत पहिल्यांदाच गोल करण्यात अपयशी ठरलेला मेस्सी स्विस डिफेन्समुळे आधीच कमालीचा हताश आणि चिडलेला होता. हा राग पहिल्या हाफमध्ये फ्री-किक दरम्यान उफाळून आला. मेस्सी अर्जेंटिनाच्या डिफेन्सिव्ह वॉलचा भाग असताना, रेफ्री पिन्हेरो यांनी त्याला अत्यंत उद्धट स्वरात मागे सरकण्यास सांगितले. रेफ्रींच्या बोलण्याचा लहजा (Tone) सहन न झाल्याने मेस्सी त्यांच्यावर धावून गेला आणि थेट बोट दाखवत म्हणाला, “माझ्याशी नीट बोल! माझा अनादर करू नकोस. मी तुझ्याशी आदराने बोललो आहे, त्यामुळे तूही माझ्याशी नीटच बोललं पाहिजेस.” जगातील या महान फुटबॉलपटूचे हे आक्रमक रूप पाहून रेफ्रीही थक्क झाले.
Messi to João Pinheiro (Referee):
“Don’t disrespect me. I speak to you with respect so don’t disrespect me.” pic.twitter.com/nvfl4fwrD1
— The Sports Pulse (@Tsportspulse) July 12, 2026
रेफ्री जोआओ पिन्हेरो यांच्यावर प्रश्न उपस्थित –
🚨🗣️ Lionel Messi to Portuguese referee João Pinheiro:
“Speak to me with respect. Don’t disrespect me.
I’m speaking to you respectfully, and you need to respect me as well.
You don’t know how to speak to people, and you need to show me respect.” 😳🇦🇷 pic.twitter.com/jvARiaPcxS
— KinG £ (@xKGx__) July 12, 2026
या सामन्यात रेफ्री पिन्हेरो केवळ मेस्सीच्याच नव्हे, तर स्वित्झर्लंडच्या फॅन्सच्याही निशाण्यावर आले. दुसऱ्या हाफमध्ये त्यांनी ‘VAR’ (व्हिडिओ असिस्टंट रेफ्री) ची मदत घेत स्वित्झर्लंडचा स्टार खेळाडू ब्रील एम्बोलो याला डाइविंगच्या आरोपाखाली थेट रेड कार्ड दाखवून मैदानाबाहेर काढले. १० खेळाडूंसह खेळणाऱ्या स्विस संघावर यामुळे प्रचंड दबाव आला आणि त्यांना सामना गमवावा लागला.
कोण आहेत रेफ्री जोआओ पिन्हेरो?
पुर्तगालमध्ये जन्मलेले ३८ वर्षीय जोआओ पेड्रो पिन्हेरो हे युरोपमधील सर्वात नामांकित रेफ्रींपैकी एक आहेत. २०१६ मध्ये फिफा इंटरनॅशनल बॅज मिळवणाऱ्या पिन्हेरो यांनी युईएफए चॅम्पियन्स लीग, युरोपा लीग आणि २०२५ च्या प्रसिद्ध युईएफए सुपर कपमध्ये अंपायरिंग केले आहे. याच उत्कृष्ट ट्रॅक रेकॉर्डमुळे त्यांची २०२६ च्या वर्ल्ड कपसाठी निवड करण्यात आली आहे.





