Messi Statue Removed : मेस्सीचा ‘तो’ भव्य ७० फुटी पुतळा अचानक हटवला! कोलकात्याच्या लेक टाऊनमध्ये नक्की काय घडलं?
Messi Statue Removed : कोलकाताच्या लेक टाऊन परिसरातून लिओनेल मेस्सीचा ७० फूट उंच पुतळा हटवण्यात आला आहे. नेमकं कारण काय? जाणून घेऊया

Lionel Messi Kolkata 70 Foot Statue Removed : पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील ‘लेक टाऊन’ परिसरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. अर्जेंटिनाचा फुटबॉलचा जागतिक सुपरस्टार लिओनेल मेस्सीचा येथे उभारण्यात आलेला भव्य आणि महाकाय ७० फूट उंच पुतळा सोमवारी प्रशासनाने अखेर हटवला आहे. नुकत्याच आलेल्या भीषण वादळामुळे हा पुतळा अत्यंत अस्थिर झाला होता आणि तो कधीही कोसळण्याचा मोठा धोका निर्माण झाला होता.
स्वतः मेस्सीने केले होते अनावरण; पण वर्षभरातच परिस्थिती बदलली!
सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ कडक पावले उचलत हायड्रॉलिक क्रेनच्या साहाय्याने हा पुतळा चबुतरावरून खाली उतरवून ट्रकवर लोड केला आणि तिथून हलवला. हा भव्य पुतळा डिसेंबर २०२४ मध्ये कोलकाता येथे बसवण्यात आला होता. विशेष म्हणजे, जेव्हा लिओनेल मेस्सी स्वतः कोलकाता दौऱ्यावर आला होता, तेव्हा त्याने आपल्या हस्ते रिमोट कंट्रोलद्वारे या ७० फुटी पुतळ्याचे मोठ्या थाटामाटात उद्घाटन केले होते. लेक टाऊन परिसराची ही मोठी ओळख बनली होती.
पुतळा धोकादायकरित्या होत हलत –
#InPics | The 70-foot-tall statue of Lionel Messi installed in Lake Town, Kolkata, was removed on Monday after it became unstable following a recent storm. The Public Works Department used a hydraulic crane to load the statue onto a truck amid concerns that it could collapse.… pic.twitter.com/kPYkfz5Ee3
— IndiaToday (@IndiaToday) June 1, 2026
मात्र, काही दिवसांपूर्वी आलेल्या जोरदार वादळानंतर स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले की हा पुतळा धोकादायकरित्या हलत आहे. घाबरलेल्या नागरिकांनी तातडीने लेक टाऊन पोलीस ठाण्यात याची तक्रार केली. यानंतर पोलीस आणि पीडब्लूडी (PWD) अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. तेव्हा कंत्राटदाराने (ठेकेदार) तपासणी करून सांगितले की, पुतळ्याच्या पायाला जोडणाऱ्या फाउंडेशन बोल्टमध्ये गंभीर बिघाड झाला आहे. हा पुतळा अत्यंत धोकादायक बनला असून तो कधीही कोसळू शकतो, अशी स्पष्ट इशारा कंत्राटदाराने दिला.
पुतळा सुरक्षित, पण पुढचा मुक्काम कुठे?
🚨 Just In 🚨
The #Messi statue in Lake Town has finally been removed By PWD. Due to recent storms and heavy rain, the structure had become unstable and was swaying significantly, posing a potential risk. pic.twitter.com/oUAeYQxaKl
— Saahil Vashishtha ࿗ 🪷 (@Saahil_Vshishth) June 1, 2026
कंत्राटदाराच्या इशाऱ्यानंतर सोमवारी PWD ने हा पुतळा तातडीने हटवण्याचा मोठा निर्णय घेतला. हायड्रॉलिक क्रेनच्या मदतीने पुतळ्याला कोणताही धक्का लागू न देता सुरक्षितपणे उतरवण्यात आले. सध्या हा पुतळा पीडब्लूडीच्या देखरेखीखाली सुरक्षित ठेवण्यात आला आहे. हा पुतळा पुन्हा कुठे बसवला जाणार, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, तो रवींद्र सरोबर किंवा इको पार्क येथे स्थलांतरित केला जाऊ शकतो, अशी जोरदार चर्चा असून राज्य सरकारच्या अंतिम मंजुरीची प्रतीक्षा आहे.





