Shruti Hasan : लिव्ह इनमध्ये राहायला आवडतं, पण लग्न….; अभिनेत्री श्रृती हसनने घेतला मोठा निर्णय

सिनेमा इंडस्ट्रीतील कलारांच्या अफेअर्सबद्दल अनेक चर्चा होताना दिसतात. तसेच या अफेअर्सनंतर अनेकजण लग्न बंधनात देखील अडल्याचे आपण पाहिले आहे. तर काही अभिनेत्री आई देखील बनल्या आहेत. मात्र, टॅालीवूड आणि बॅालीवूडमधील आपल्या वेगळ्या अभिनय शैलीने सर्वांची मने जिंकणाऱ्या अभिनेत्री श्रृती हसन हिने तिचे लग्नाविषयीचे प्ररखड मत मांडत कधीही लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे. तिच्या या निर्णयामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
श्रुतीला लग्नाविषयी एका मुलाखतीमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. तो प्रश्न असा होता की, तुम्ही लग्न करण्याच्या निर्णयावर ठाम आहात का? या प्रश्नावर श्रृतीने आपले विवाहविषयी प्ररखड मत मांडले. ती म्हणाली, मला नाती आवडतात, प्रेम, रोमांन्स आणि लिव्ह इनमध्ये देखील राहायला आवडतं. पण लग्न आणि अटॅचमेंटची भीती वाटत असल्याची तिने सांगितले. तिच्या लग्नाविषयीच्या या उत्तरामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आवडणाऱ्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये राहण्यासही श्रृतीची तयार आहे. पण लग्नाच्या बेडीत अडकण्याची ती तयार नाही, असं स्पष्टपणे तिने सांगितले.
श्रृती ‘लिव्ह इन’मध्ये राहत होती
अभिनेत्री श्रृती हसनचा एक्स बॅायफ्रेन्ड शंतनू हजारिकासोबत ३ ते ४ वर्ष लिव्ह इनमध्ये होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी तिचे त्याच्यासोबत ब्रेकअप झाले आहे. मात्र, अद्यापही ती तिच्या लग्न न करण्याच्या भूमिकेवर ठाम आहे. श्रृती दिग्दर्शन लोकेश कनगराज यांच्या कुली सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात ती सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे.





