Shefali Shah : आम्हा कलाकारांच्या आयुष्याचा सोशल मीडिया हा अविभाज्य भाग झाला आहे. आम्हाला ते आवडो न आवडो, पण आम्हाला त्या माध्यमावर हजेरी लावावी लागते. नुसती हजेरी नाही तर ‘आम्ही कसे कालसुंसगत आहोत’ हेदेखील पटवून द्यावं लागतं. काही वर्षांपूर्वी आधी कलाकार आणि नंतर त्यांच्या ‘पब्लिसिटी’चा मुद्दा यायचा. आता कलाकार राहिले मागे आणि ‘पब्लिसिटी’ हा मुद्दा पुढे रेटला जातो, असे परखड मत बॅालिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री शेफाली शाह हिने व्यक्त केले आहे. पुढे अभिनेत्री म्हणाली, आधी कलाकारांना पब्लिसिटीमध्ये समाविष्ट करून घेतलं जायचं, आता पब्लिसिटीमध्ये कलाकारांचा समावेश केला जातो, हे खटकणारं असलं तरी वास्तव आहे, असे रोखठोक भाष्य अभिनेत्रीने सध्याच्या परिस्थितीवर केले आहेत. तिने सोशल मीडियावर संदर्भात व्यक्त केलेले मत याची चर्चा होत आहे. शेफाली दिल्ली क्राइम या लोकप्रिय वेबसिरीच्या तिसऱ्या सीझनमुळे चर्चेत आहे. शेफालीची मुख्य भूमिका असलेली दिल्ली क्राइम हि बेबसिरीज नुकतीच नेटफ्लिक्सवर स्ट्रिम करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून या सिरीजची भरपूर चर्चा होती. अखेर सिरीजचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिरीजमधून पुन्हा एकदा शेफाली पोलीस अधिकारी वर्तिका चतुर्वेदी यांच्या भूमिकेत दिसत आहेत. तिच्यासोबत इतरही सहयोगी कलाकार आहेत. या सिरीजमधील शेफालीच्या भूमिकेचे विशेष कौतुक केले जात आहे. या सिरीजविषयी बोलताना शेफाली म्हणाली, जुन्या कलाकृतीचा नवा भाग असो, वा पूर्णपणे नवी कलाकृती असो, कामाला सुरुवात करताना मी टेन्शनमध्येच असते, असे ती म्हणाली. दिल्ली क्राइमचा नवा सीझन हाती घेताना मनात मिश्र भावना असतात. उत्सुकता शिगेला पोहचते असे देखील तिने सांगितले. हेही वाचा : “भारताला हिंदू राष्ट्र घोषित करणे आवश्यक….” ; RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान