युद्धामुळे जगणं झालं महाग; 5 रुपयांच्या पारले बिस्कीटच्या पाकिटासाठी गाझात मोजावे लागतायतं २३५० रुपये

Parle-G Biscuits | युद्धाच्या गर्तेत अडकलेल्या गाझामधील बाप-लेकीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. इस्रायलने गाझामध्ये युद्ध बंदी केल्यानंतर गाझावासिय आनंदित झाले होते. परंतू, त्यांच्या आनंदावर लगेचच विरजण पडले. हमासविरोधात पुन्हा कारवाई सुरु झाली आणि इस्रायलने गाझाचे सर्वच मार्ग बंद केले. शस्त्रपुरवठा, अन्न धान्याचाही पुरवठा या भागात न होऊ देण्याचा निर्णय घेतला गेला. अन्न धान्याचा तुटवडा असल्याने लोकांचे हाल सुरू झाले आहेत.
इस्रायलने मदतीचे सर्व मार्ग बंद केल्याने ही परिस्थिती उद्भवली असून खाण्यापिण्याच्या वस्तू कित्येक पटींनी जास्त पैसे मोजून घ्यावे लागत आहे. भारतामध्ये पार्ले-जी बिस्किटचा एक पुडा 5 रुपयांना मिळतो. मात्र अशा 12 पुड्यांचे पॅकेट गाझामध्ये 2350 रुपयांना घ्यावा लागत आहे.
मोहम्मद जवाद या गाझामध्ये राहणाऱ्या व्यक्तीने व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. मुलीला आवडतो म्हणून तिच्या आनंदासाठी आपण 5 रुपयांच्या पारलेजीचे भारतात 60 रुपयांना मिळणारे पाकीट 2350 रुपयांना आणले असल्याचे म्हटले आहे.
गाझामधील पित्याचा व्हिडिओ व्हायरल
गाझामधील एका पित्याने सोशल मीडियावर केलेली पोस्ट व्हायरल झाली आहे. “बऱ्याच प्रतीक्षेनंतर, आज मला अखेर रविफसाठी तिचे आवडते बिस्किट मिळाले. किंमत 1.5 युरोवरून 24 युरो झाली असली तरी, मी रविफला तिचा आवडता पदार्थ नाकारू शकलो नाही,” असे मोहम्मद जवाद नावाच्या या व्यक्तीने लिहिले आहे.
After a long wait, I finally got Ravif her favorite biscuits today. Even though the price jumped from €1.5 to over €24, I just couldn’t deny Rafif her favorite treat. pic.twitter.com/O1dbfWHVTF
— Mohammed jawad 🇵🇸 (@Mo7ammed_jawad6) June 1, 2025
भारतीय बाजारपेठेतील सर्वात स्वस्त बिस्किट अशी ओळख असणाऱ्या बिस्किटाची ही किंमत वाचून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत. या बिस्कीट पुड्याची किंमत जी आधी 1.5 युरोला होती ती आता 24 युरो झाली असल्याचे त्याने यात म्हटले आहे. इतकेच काय तर 1 किलो साखर 4,914 रुपये आणि 1 किलो बटाट्यासाठी 1,965 रुपये गाझामध्ये मोजावे लागत आहे.
दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून गाझामध्ये हमास आणि इस्रायल यांच्या संघर्षामुळे भीषण अन्नटंचाई निर्माण झाली आहे. या अन्नटंचाईचं भीषण वास्तव पुन्हा एकदा समोर आलं आहे.
हेही वाचा :





