लॉकडाऊनमध्ये सेवा पुरवठा करणाऱ्यांसाठी परवाना बंधनकारक
Updated On:

पुणे – करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन लागू केले आहे. यामधून जीवनाश्यक वस्तूंचे वितरण आणि अत्यावश्यक सेवा यांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे जीवनाश्यक वस्तूविषयक सुविधा, त्यांचा पुरवठा, वैद्यकीय सेवा, घरपोच धान्ये वितरण आदी सेवा-सुविधा सुरळीतपणे राहण्यासाठी त्याच्या परवानगीसाठी जिल्हा प्रशासनाने सात उपजिल्हाधिकारी आणि दोन तहसीलदारांची नेमणूक केली आहे.
अर्जांचे स्वरूप व बाब लक्षात घेऊन तातडीने पासेस किंवा परवानगी देण्याची कार्यवाही करण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. यामध्ये वीज, पाणी पुरवठा, अग्निशमन, बॅंका, धान्य, भाजीपाला, दूध, शेती संबधित उत्पादणे, पशुखाद्य, माहिती तंत्रज्ञान, उद्योग, पेट्रिलियम कंपन्या आदींना परवानगी देण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातून यासाठी परवानगी देण्यात येणार आहे.





