पुणे जिल्हा | वडिलांचे कार्य पुढे नेण्याचा प्रयत्न करू

नारायणगाव, (वार्ताहर)- माझे वडील जुन्नरचे माजी आमदार कै. वल्लभ बेनके यांना आपल्यातून जाऊन पाच महिने झाले. त्यांची सातत्याने आठवण येत असते. त्यांच्या मनातील कार्य पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार असल्याचे जुन्नर तालुका राष्ट्रवादीचे युवा नेते, तालुका औद्योगिक वसाहतीचे चेअरमन अमित बेनके यांनी म्हटले आहे.
नारायणगावचे ग्रामदैवत मुक्ताई देवी मंदिरात त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा पार पडला त्यावेळी बोलत होते. मुक्ताई मंदिरात ऊर्जा व शक्ती मिळत असल्याने वडिलांनी केलेल्या संस्कारामुळे आज मोठा भाऊ आमदार अतुल बेनके यांच्याबरोबर सामाजिक कार्यात काम करीत असल्याचे सांगत असताना गहिवरून आले.
बेनके कुटुंबीयांची वारकर्यांसमवेत नाळ जोडलेली असल्याने त्यांच्या ऋणात राहणे आवडते. कै. माजी आमदार वल्लभ बेनके यांच्या स्मृती प्रित्यर्थ ज्ञानदान, वस्त्रदान व अन्नदान करण्याचा संकल्प केला आहे. अभिष्टचिंतन सोहळ्यात अमित बेनके यांनी नारायणगावातील 15 भजनी मंडळ, वारकरी, प्रवचनकार अशा 299 वारकर्यांचा संपूर्ण पोषाख देऊन सन्मान केला.
अभिष्टचिंतन सोहळ्यात कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष अनिल मेहेर यांनी अमित बेनके सर्वांना बरोबर घेऊन जाणारा युवा नेता असल्याचे नमूद करून बेनके परिवार नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असल्याचे सांगितले. अमित बेनके यांच्याकडून समाजसेवा घडावी अशा भावना व्यक्त करून ग्रामोन्नती मंडळाच्या वतीने सन्मान केला.
कार्यक्रमात डी. के भुजबळ, अशोक पाटे, विलास पाटे यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी रोहिदास केदारी, राहुल गावडे, संजय वारुळे, अविनाश घोलप, विकास दरेकर, रमेश मेहेत्रे, विकास फुलसुंदर, प्रकाश पाटे, विलास पानसरे, नामदेव खैरे, विशाल भुजबळ, गणेश तांबे,
ज्ञानेश्वर रासने, अनिल डेरे, अतुल आहेर, रामदास अभंग, हितेश कोर्हाळे, गणेश वाजगे, शंकर शेटे, सुदीप कसाबे, शेखर ढवळे, मा. उपसरपंच ज्योती संते, जावेद पटेल, जुबेर आतार, ऋषी वाजगे, सागर दरंदळे, महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामदास अभंग यांनी तर हितेश कोर्हाळे यांनी आभार मानले.





