Satara | शरद पवारांवर बोलायची आ. गोरेंची लायकी नाही : अभयसिंह जगताप

दहिवडी, (प्रतिनिधी) – आडनाव गोरे आणि धंदे काळे असणाऱ्या आ. जमीनकुमार चोरेंना महिलांसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी क्रांतिकारी निर्णय घेणाऱ्या शरद पवार यांच्यावर बोलायची लायकी नाही, अशी टीका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभयसिंह जगताप यांनी दहिवडी येथील शासकीय विश्रामगृहातील आयोजित पत्रकार परिषदेत केली.
भयसिंह जगताप म्हणाले, प्रशासनाला वेठीस धरून लाडकी योजनेचा कार्यक्रम पार पडला आणि महिलांच्या कार्यक्रमात महिलांच्या दिशेने बंदुकीतून गोळ्या झाडलेल्या ऍक्शन केल्या.
म्हसवड, दहिवडी वडूज येथील कार्यक्रमात शरद पवार यांच्यावर टीका टिप्पणी केल्या. परंतु, पवार साहेबांनीउमो महिलांसाठी मालमत्तेत मुलाप्रमाणे मुलीलाही सामान हिस्सा देऊन मुलींना न्याय दिला आहे.
पंचायतराजमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण दिल्यामुळे महाराष्ट्रात हजारो माता भगिनी सरपंच, नगराध्यक्ष, सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार, खासदार, मंत्री झाल्या. त्यामुळे माता भगिनींना सन्मान मिळू लागला.
सशस्त्र दलामध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळवून दिल्यामुळे महिला सैनिकी दलात काम करत आहेत. बारामतीमध्ये शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी महिला बचत गटांसाठी क्रांतिकारी योजना अंमलात आणल्या. भाजपसारखे महिलांना आळशी न बनवता स्वतःच्या पायावर उभा राहायला शरद पवार यांनी शिकविले.
माण खटावला पृथ्वी बंधारे माण खटावमध्ये शरद पवार यांच्या फंडातून झालेले आहेत. माण खटावला पाणी मिळावे यासाठी उरमोडीचे पाणी २०१४ साली उरमोडी धरणात सोडले, जिहे-कटापूरचे पाणी माणला मिळावे यासाठी २००१ साली नेर ते नवलेवाडी बोगद्याचे उदघाटन केले.
माणची जमीन कायम पाण्याखाली राहावी यासाठी आयोजन केलेल्या पाणी फौंडेशन योजनेला २५ कोटी रुपये दिल्यामुळे राज्यात ही योजना माणमध्ये मोठया प्रमाणात यशस्वी झाली.
असे अनेक क्रांतिकारी निर्णय शरद पवार यांनी घेतले आहेत. त्यामुळे वारंवार पक्ष बदलणाऱ्या जमीनचोर आणि मृताचे खाणाऱ्या जयकुमार गोरे यांची सूर्याप्रमाणे असणाऱ्या शरद पवार यांच्यावर बोलायची लायकी नाही.
1981 उरमोडीला पहिली मान्यता आली तो एक टीएमसीचा डॅम मंजूर झाले. त्या काळात शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते. त्या काळात सध्याचे लोकप्रतिनिधी पहिलीत असतील.
1994साली ज्या काळात पाणी संघर्ष समिती मधील धोंडीराम वाघमारे सदाशिव पोळ, भाऊसाहेब गुदगे, डॉ कापसे अश्या अनेक लोकांनी माण खटावसाठी उठाव केला. त्यावेळी शरद पवारांनी त्याची क्षमता वाढवून आठ टीएमसीवर करण्याचा निर्णय घेतला.
1995 कृष्णा खोरे विकास महा विकास मंडळाची स्थापना झाली आणि त्याअंतर्गत माण-खटावला पाणी देण्याचा निर्णय झाला. 1995 साली ज्यावेळी युतीचे सरकार आले आणि त्यांना अपक्ष पाठिंबा दिला.
त्यावेळी त्यांची प्रमुख मागणी होती की त्यांनी दुष्काळी भागांना पाणीपुरवठा करावा 2000 पर्यंत इरिगेशन खात्याचा संपूर्ण फंड वापरून उरमोडी तारळी यासारखे प्रकल्प पूर्णत्वास आले.
2001साली विदर्भातील नेत्यांनी ओरड केली की आमच्यावर अन्याय होतोय त्यामुळे 2002 साली विदर्भातील अनुशेष पूर्ण होत नाही तो पर्यंत पश्चिम महाराष्ट्राला निधी मिळणार नाही हा निर्णय घेण्यात आला.
त्यामुळे तिथून पुढे 10वर्षे प्रकल्प रखडले गेले. 2006 मध्ये किरकसाल बोगद्याचे भूमिपूजन करण्याचे काम आर आर पाटील यांनी केले.
त्यामुळे ही सर्व कामे मी केली असा फुकटचा आव आणण्याची गरज नाही. याचे संपूर्णश्रेय शरद पवार यांना जाते. त्यामुळे विद्यमान आमदार यांनी पण्याच्ये श्रेय घेण्याचा प्रयत्न अजिबात करू नये, असा टोला अभयसिंह जगताप यांनी लगावला.





