Sharad Pawar । विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष आपली ताकद आजमावून पाहत आहेत . त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ‘जनसन्मान यात्रे’चा शुभारंभ केला आहे. तर शरद पवार गटाकडून शिवस्वराज्य यात्रेचा शुभारंभ करण्यात आला आहे. या निमित्याने आज खासदार सुप्रिया सुळे धाराशिव येथे दाखल झाल्या आहे.
या यात्रेच्या माध्यमातून सुप्रिया सुळे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहे. आणि विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. अशात
आज धाराशिव येथे दाखल होताच सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांनी आई तुळजाभवानीचे दर्शन घेतले. राज्यात चांगला पाऊस पडू दे,अडचणीत आलेल्या बळीराजाला मदत मिळू दे, असं साकडं खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांनी तुळजाभवानीच्या चरणी घातलं.
तर मंदिरातील पुजारी यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारचंद्र पवार पक्षासाठी प्रार्थना केली. ज्येष्ठ नेते शरद पवार पंतप्रधान व्हावे, अशी इच्छा पुजाऱ्याने बोलून दाखवली. दरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
दरम्यान, अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली. अनेक आमदार शरद पवार यांना सोडून महायुतीत सहभागी झाले. अशातच हार न मानता 84 वर्षांचे शरद पवार पुन्हा नव्या जोमाने मैदानात उतरले. लोकसभा निवडणुकीत त्यांनी 10 पैकी 8 जागांवर आपले उमेदवार निवडून आणले. आता विधानसभा निवडणुकीतही आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त आमदार निवडून यायला हवेत, असा निर्धार शरद पवार यांनी केलाय.