पैसा आणि मॅन पॉवर लागणार कमी ! जुगाड वापरून शेतकऱ्याने बनवलं हळदीच्या पिकासाठी हार्वेस्टर

ज्यांच्यात उत्साह आणि काहीतरी वेगळं करण्याची जिद्द असते तेच काहीतरी नवीन करतात. शेतकऱ्यांच्या बाबतीत हे उदाहरण अनेकदा पाहायला देखील मिळत. कारण शेतकरी कितीही अडचणी आल्या तरी थांबत नाही. नव नवीन प्रयोग करून तो अनेकदा जुगाडू काम करता करता नवीन प्रणाली देखील डेव्हलप करतो. असच काहीस शेतकरी पी रामराजू यांनी हळदीच्या पिकासाठी केलं आहे. रामराजू हे तामिळनाडूच्या इरोड जिल्ह्यातील रहिवासी असून त्यांनी हळद लागवडीत येणाऱ्या अडचणी पाहून शेतकऱ्यांसाठी एक मशीन बनवली आहे. या यंत्राद्वारे हळद खोदली जाते. वर्षभराच्या मेहनतीनंतर त्यांनी हे स्वदेशी जुगाड मशीन बनवले आहे.
हळद लागवडीसाठी खूप मेहनत आणि खर्च करावा लागतो कारण हळद लागवडीसाठी खुरपणी, खत फवारणी, हळदीच्या गाठी खोदणे आणि नंतर साफसफाईसाठी जास्त मजूर लागतात. अशा समस्या पाहून रामराजू यांनी घरगुती मशीन बनवले आहे.
हळद खोदण्याचे यंत्र
आपले यंत्र व त्याच्या गरजा सांगताना शेतकरी रामराजू म्हणाले की, हळद शेतीमध्ये मजुरांअभावी खूप त्रास सहन करावा लागला. या नुकसानीनंतरच मोठ्या प्रमाणात मजुरांची गरज भासणार नाही म्हणून जमिनीतून हळदीच्या गड्ड्या खोदून काढणारे यंत्र बनवण्याचा विचार त्यांच्या मनात आला. ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी इलेक्ट्रिक टिलर म्हणजेच पॉवर टिलर बनवले आहे.
सात तासांत एक एकर खोदकाम
शेतकरी पी रामराजू यांनी सांगितले की, या यंत्राने हळद खोदली असता संपूर्ण हळद जशीच्यातशी बाहेर येते. यावेळी यंत्रामुळे मोठ्या प्रमाणात माती निघते. या यंत्राच्या साह्याने खोदकाम करून शेतकरी सात तासांत एक एकर खोदू शकतात. ठिबक सिंचन असलेल्या शेतातून हळद काढण्यासाठी हे यंत्र फायदेशीर असल्याचे समजते.
खर्चाची बचत
रामराजू यांनी सांगितले या मशिनद्वारे एक एकर हळद काढण्यासाठी एक पुरुष आणि १५ ते २० महिलांची गरज आहे, तर मशिनशिवाय किमान ८० जणांची हळद काढण्याची गरज लागते. या मशीनमधून एक एकर हळद काढण्यासाठी सात ते नऊ हजार रुपये खर्च येतो. हे यंत्र एक तास चालवताना एक लिटर डिझेल लागते, ज्याचा खर्च सामान्य शेतकरीही सहज उचलू शकतो.
मशीनची किंमत 30 हजार रुपये
स्वदेशी यंत्र बनवणाऱ्या रामराजू दक्षिण भारतातील विविध राज्यांमध्ये त्याचे प्रात्यक्षिकही दाखवले आहे. त्यांनी बनवलेल्या या मशीनची किंमत 30 हजार रुपये आहे. शेतकरी रामराजू यांनी आतापर्यंत 172 मशीनची विक्री केली आहे. रामराजू शेतकऱ्यांना हे यंत्र चालवण्याच्या सूचनाही देतात आणि गरज पडल्यास शेतकऱ्यांपर्यंत जाऊन मशीनची सेवाही देतात.





