सातारा : भिलार किंगबेरी परिसर यांच्या बाजूला शेतामध्ये असलेल्या विहिरीमध्ये आज बिबट्या पाण्याच्या शोधात आला असता विहिरीमध्ये पाडल्याची घटना घडली. सकाळी विहिरीमधून कोणत्यातरी प्राण्यांचा आवाज येत असल्याचे ग्रामस्थांना समजले तेव्हा आत डोकावून पाहिले असता बिबट्या त्या विहिरीमध्ये पडल्याचे आढळून आले. यानंतर सदर घटनेची बातमी भिलार मध्ये अगदी वाऱ्यासारखी पसरले व त्या बिबट्याला पाहण्यासाठी गावातील लोकांनी एकच गर्दी केली. बिबट्या पडल्याची बातमी वनविभागाला दिली असता वन विभागातील अधिकारी घटनास्थळी पोहोचले व बिबट्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले. सुरुवातीला बिबट्याला पाहणाऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे व लोकांच्या आरडा ओरडामुळे बिबट्या बाहेर काढण्यात अडथळा निर्माण होत होता. जेवढा बिबट्याला बाहेर काढण्यात त्रास झाला नाही तेवढा त्रास लोकांना बाजूला काढण्यात वन विभागाला झाला. यानंतर बिबट्याने विहरी मधून बाहेर पडताच पळ काढला. भिलार महाबळेश्वर परिसरात बिबट्याचा वावर हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे पण आता हा वावर दिवसाढवल्या गावांमधून होत आहे. यामुळे गावातील लोकांमध्ये चिंतेचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.