धनगरवाडी येथे कायदेविषयक शिबिर उत्साहात संपन्न: विधी सेवा समिती व बार असोसिएशनचा उपक्रम

ओझर : ११ जुलैला जुन्नर तालुका विधी सेवा समिती जुन्नर जिल्हा पुणे व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे व जुन्नर तालुका बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने ग्रामपंचायत धनगरवाडी येथे कायदेविषयक शिबिर पार पडले.
कार्यक्रमासाठी श्रीमती एस. एस. जैन दिवाणी न्यायाधीश जुन्नर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत धनगरवाडी येथिल शिवछत्रपती सभागृह सकाळी ९:३० ते १०:३० या वेळेत कायदेविषयक शिबिर संपन्न झाले.
सदर शिबिरात जुन्नर तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड शिवदास तांबे, सचिव ॲड आशिष वानखेडे, ॲड सचिन यशवंत चव्हाण, ॲड रणजीत भगत, ॲड हेमंत यशवंत हडवळे,ॲड आरती नलावडे व धनगरवाडी ग्रामपंचायतचे सरपंच महेश शेळके, उपसरपंच राजेंद्र शेळके, ग्रामपंचायत सदस्य इंद्रजीत शेळके, ग्रामसेविका सुजाता खंडे, ॲड साईराज शेळके यावेळी न्यायालयीन कर्मचारी प्रशांत मोरतळे, शिपाई जालिंदर शिंगोटे ग्रामपंचायत सदस्य व मा.सरपंच गणपत शेळके, देवस्थानचे अध्यक्ष विकास शेळके, रमेश शेळके, ईश्वरनाथ शेळके, मारुती पाटील शेळके, राजेंद्र शेळके, सखाराम शेळके, रमेश पाटोळे, अक्षय मोहन, अमोल भोर, ग्रामपंचायत ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
न्यायमूर्ती एस.एस जैन यांनी वकील हे आर्टिस्ट असतात. देशाची प्रगती करायची असेल तर पालकांनी आपल्या मुलांना फक्त शिक्षण देऊन देशाची प्रगती होणार नाही, तर पालकांनी डिजिटल शिक्षण व माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी करून त्यांना आत्मनिर्भर करून स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी प्रयत्न करावे असे प्रतिपादन केले.
तसेच मुलांचे हक्क या विषयावर ॲड सचिन यशवंत चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. सार्वजनिक उपयुक्तता सेवा आणि राज्य आणि केंद्र सरकारच्या योजना या विषयावर ॲड रणजीत रोहिदास भगत यांनी बाल न्याय/मुलांची काळजी आणि संरक्षण कायदा २०१५ या विषयावर ॲड हेमंत यशवंत हाडवळे तसेच शिक्षणाचा अधिकार व जागतिक लोकसंख्या या विषयावर ॲड आरती नलावडे यांनी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच महेश शेळके, सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य, चेरमन ग्रामसेवा पतसंस्था इंद्रजीत शेळके व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका प्रियांका शेळके यांनी केले.





