भारत 2025 पर्यंत क्षयमुक्त करण्याचा संकल्प – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पिंपरी – शतकानुशतकं आपल्या भारतीय जीवनशैलीचा अविभाज्य घटक राहिलेल्या योगाभ्यास आणि आयुर्वेद या आपल्या शास्त्रांसमोर मात्र पुराव्यावर आधारित संशोधनाचा अभाव, हे नेहमीच एक आव्हान राहिलं आहे. सबका प्रयासच्या या भावनेतूनच आपण 2025 सालापर्यंत भारताला क्षयमुक्त करण्यासाठी काम करत आहोत, असा संकल्प देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
“मन की बात” या कार्यक्रमाच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवडमधील विविध क्षेत्रातील नागरिकांशी पंतप्रधान मोदी यांनी संवाद साधला. ऑटो क्लस्टर सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, माजी महापौर माई ढोरे, भाजप महिला शहराध्यक्षा उज्जवला गावडे, माजी महापौर नितीन काळजे, राहुल जाधव, माजी उपमहापौर नानी घुले, माजी नगरसेवक शंकर जगताप, माजी पक्षनेते नामदेव ढाके, नितीन लांडगे, माजी प्राधिकरण अध्यक्ष सदाशिव खाडे,राजेश पिल्ले, हेमंतराव हरहरे, मोरेश्वर शेडगे, विजय फुगे, नंदकुमार दाभाडे, चंद्रकांत नखाते, शत्रुघ्न काटे, संदिप कस्पटे, हर्षल ढोरे, संतोष कलाटे अमित गोरखे आदी उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, आपली परंपरा आणि संस्कृती यांचं माता गंगेशी अतूट नातं, गंगाजल आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. संयुक्त राष्ट्रांनी नमामि गंगे अभियानाचा समावेश हा पर्यावरणाचा पुनर्संचय करणाऱ्या जगातील पहिल्या दहा उपक्रमांमध्ये केला आहे. तसेच, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे देशाला असामान्य नेतृत्व देणारे महान राजकीय नेते होते. प्रत्येक भारतीयाच्या हृदयात त्यांना विशेष स्थान आहे. पायाभूत सुविधा, शिक्षण किंवा परराष्ट्र धोरण, त्यांनी प्रत्येक क्षेत्रात भारताला नव्या उंचीवर नेले, अशा भावना पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केल्या.
“मन की बात” कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या शुभांगी होळकर म्हणाल्या की, पंतप्रधान मोदी यांनी कोविड काळात संपूर्ण देशातील गरजू नागरिकांना मोफत अन्नधान्य उपलब्ध करुन दिले. मोदींनी आता पुन्हा पाच वर्षांसाठी मोफत अन्नधान्य योजना आणली आणली आहे. याचा फायदा देशातील गोरगरीब नागरिकांना होणार आहे.
तुळसा हक्के म्हणाल्या की, महाराष्ट्रातील विषेशत: पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाज आहे. त्या आदिवासी समाजाची माहिती देताना त्यांनी घरगुती उद्योगांना प्रोत्साहन दिले. त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाला मदत झाली, इतकी सूक्ष्म माहिती पंतप्रधान मोदी यांनी “मन की बात”मधून मिळाली. त्यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळाले.
डॉ. प्रताप सोमवंशी म्हणाले की, स्तनाच्या कर्करोगाबाबत योगाचे महत्व पुराव्यानिशी सिद्ध झाले आहे. त्याप्रमाणे आयुर्वेदातील ज्ञानाचा पुराव्याधारित अभ्यास झाला, तर ऍलोपॅथीप्रमाणे जगभरात आयुर्वेदाचाही प्रचार-प्रसार होईल, असा सूचना मी “मन की बात” मध्ये केली आहे. तसेच, डॉ. प्रशांत देशमुख, डॉ. प्रमोद कुबडे, डॉ. सुभाष निकम, डॉ. रमेश केदार यांनीही “मन की बात” मध्ये सहभाग घेतला आणि आपली निरीक्षणे नोंदवली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोरेश्वर शेडगे यांनी तर संयोजक नंदकुमार दाभाडे यांनी आभार मानले.





