पिंपरी | गोरेगाव वांगी येथे रविवारी पेरे-पाटील यांचे व्याख्यान
Updated On:

वडूज, (प्रतिनिधी) – गोरेगाव (वांगी, ता. खटाव) येथे माऊली सोशल फाऊंडेशनच्यावतीने रविवारी ( दि. २ जून) रोजी सायंकाळी ६.३० वाजता पाटोदा (जि.बीड) चे आदर्श सरपंच भास्करराव पेरे-पाटील यांचे व्याख्यान व पुरस्कार वितरण सोहळा होणार असल्याची माहिती अध्यक्ष सुनिल सावंत, सचिव शिवाजी खाडे यांनी दिली.
या कार्यक्रमाचे यंदा तिसरे वर्ष आहे. यावेळी श्री.पेरे-पाटील यांच्या व्याख्यानाबरोबरच समाजातील विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.
तसेच यावेळी आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात हा कार्यक्रम होणार असून कार्यक्रमास नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.





