Hezbollah-Israel War: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात लेबनाॅनमधील मृतांची संख्या 492 वर, 1600 हून अधिक लोक जखमी

Hezbollah-Israel: इस्रायली सैन्याने लेबनॉनमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात मृतांची संख्या 500 च्या जवळ पोहोचली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इस्रायलच्या हवाई हल्ल्यात 492 लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 35 मुले आणि 58 महिलांचा समावेश आहे. तर 1645 जण जखमी झाले आहेत.
लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, इस्रायली हवाई हल्ले बिंट जबेल, अतारोन, मजदल सालेम, हौला, तोरा, कालालेह, हरिस, नबी चित, तरैया, श्मेस्टार, हरबता, लिब्बाया आणि सोहमोर यासह डझनभर शहरांवर झाले. लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्र समन्वयक म्हणाले की, राजनैतिक प्रयत्नांना यश मिळाले पाहिजे, युद्ध थांबले पाहिजे, कारण दोन्ही बाजूंच्या नागरिकांची सुरक्षा आणि प्रदेशाची स्थिरता धोक्यात आहे.
रविवारी, हिजबुल्लाहने उत्तर इस्रायलमध्ये 100 हून अधिक रॉकेट डागले. इस्रायलच्या हैफा शहराजवळ रॉकेट पडले. या हल्ल्यात चार जण जखमी झाले. रॉकेट हल्ल्यानंतर हिजबुल्लाहचा उपनेता नईम कासिमने खुल्या युद्धाची घोषणा केली होती. प्रत्युत्तरादाखल, इस्रायलने दक्षिण लेबनॉनमधील हिजबुल्लाह लक्ष्यांवर हल्ला केला, त्यात एअरबेस आणि लष्करी उत्पादन सुविधांचा समावेश होता.
इस्रायली सैन्याने सांगितले की हिजबुल्लाहने 20 सप्टेंबर रोजी उत्तर इस्रायलवर मोठा हल्ला केला. लेबनॉनमधून एका रात्रीत 150 हून अधिक रॉकेट, क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागण्यात आले. यानंतर संतप्त झालेल्या इस्रायली सैन्याने पलटवार करत हिजबुल्लाचा टॉप कमांडर इब्राहिम अकीलला ठार केले. इब्राहिम अकील हा हिजबुल्लाचा दुसर्या क्रमांकाचा कमांडर होता, तो थेट चीफ हसन नसराल्लाला रिपोर्ट करतो.
हिजबुल्लाह म्हणाला- हल्ले सुरूच राहतील
लेबनॉनमध्ये आतापर्यंत झालेल्या संघर्षात शेकडो लोक मारले गेले आहेत. इस्रायलने हिजबुल्लाला मागे ढकलण्याचे वचन दिले आहे. त्याचवेळी लेबनॉन सीमेवर हिजबुल्लाहचे लढवय्ये सतत हल्ले करत आहेत. गाझामध्ये युद्धविराम होईपर्यंत हल्ले सुरूच ठेवणार असल्याचे हिजबुल्लाहने म्हटले आहे.
इराणने इस्रायलवर केले आरोप –
इराणच्या अध्यक्षांनी इस्रायलवर मध्यपूर्वेत व्यापक युद्ध सुरू करण्याचा आणि इराणला त्यात ओढण्यासाठी सापळा रचल्याचा आरोप केला आहे.


