Rupali Chakankar Post : “तुझं असं सोडून जाणं…”; रक्षाबंधनाच्या दिवशी रुपाली चाकणकरांवर कोसळला दुःखाचा डोंगर

Rupali Chakankar Post : काल बहिण भावाच्या नात्याची साक्ष देणारा रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बहिणीने भावाला राखीने बांधतानाचे फोटो व्हाट्सअप, इन्स्टाग्रावरून शेअर करण्यात आले. मात्र, रक्षाबंधनाच्या पवित्र सणादिवशी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
त्यांच्या मावस भाऊचे निधन ९ अॅागस्टच्या रात्री झालं आहे. मावस भावाच्या अकाली निधनाने चाकणकर कुटुंबीयावर शोककळा पसरली आहे. बाळराजे माळी असं रुपाली चाकणकर यांच्या मावस भावाचे नाव असून, त्यांनी स्वतः फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरून भावूक पोस्ट शेअर केली आहे. माळी यांच्या अकाली निधनाची बातमी समजताच राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
“बाळराजे, रक्षाबंधनाच्या दिवशी तुझं असं सोडून जाणं प्रचंड वेदनादायक आहे. अफाट प्रेम, प्रचंड काळजी घेणारा तू, मनापासून सगळं बोलणारा, असं कसं न सांगता निघून गेला. न सांगता गेलास….. काय आणि कशी श्रद्धांजली वाहू.” असं रुपाली चाकणकर यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
View this post on Instagram
बाळराजे माळी यांच्या निधनाने माळी कुटुंबीयांवरही मोठा आघात झाला असून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बाळराजे माळी हे आपल्या मनमिळाऊ आणि प्रेमळ स्वभावासाठी परिचित होते. त्यांच्या या स्वभावगुणामुळे कुटुंबात आणि मित्रपरिवारात त्यांना विशेष मान होता. यामुळे त्यांच्या अकाली निधनाचे वृत्त मनाला चटका लावणारे आहे.
हेही वाचा : “‘मत चोरी’ बद्दल तक्रारीसाठी वेबसाइट, मिस्ड कॉल नंबर… ” ; राहुल गांधींचा निवडणूक आयोगाविरुद्ध नवा मोर्चा





