‘काश्मीर सोडा.. यशवंत जाधवांवर बोला’, भातखळकरांचा राऊतांना टोला

मुंबई: मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांची चौकशी करणाऱ्या आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना कोट्यवधी रुपयांच्या संशयास्पद व्यवहारांची माहिती असलेली एक डायरी सापडली आहे. अधिकार्यांना या डायरीत ५० लाख रुपयांचे घड्याळ आणि ‘मातोश्री’ला २ कोटी रुपयांची आणखी भेटवस्तू दिलेल्या नोंदी सापडल्या आहेत. मात्र, यशवंत जाधव यांनी डायरीतील नोंदींमध्ये ‘मातोश्री’ हा आपल्या आईचा उल्लेख असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, त्यांनी केलेल्या या खर्चामुळे राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
जाऊ दे हो राऊत साहेब, काश्मीर मध्ये भाजपाने जे केलं तो तुमच्या आकलना पलीकडचा विषय आहे, तुम्ही तूर्तास यशवंत जाधवांवर बोला. pic.twitter.com/9464QRFlqH
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 27, 2022
यातच आता भाजप नेते जाऊ दे हो राऊत साहेब, काश्मीर मध्ये भाजपाने जे केलं तो तुमच्या आकलना पलीकडचा विषय आहे, तुम्ही तूर्तास यशवंत जाधवांवर बोला असे खडे बोल त्यांनी सुनावले.
दरम्यान,डायरीतील पहिली नोंद त्यांच्या आईच्या वाढदिवसानिमित्त घड्याळ वाटपाची होती आणि दुसरी नोंद गुढीपाडव्याला त्यांच्या आईच्या स्मरणार्थ गरजूंना भेटवस्तू वाटपाची होती, असे स्पष्टीकरण जाधवांनी दिले आहे. २५ फेब्रुवारी रोजी आयटी विभागाने केलेल्या धाडसत्रा दरम्यान ही डायरी जप्त करण्यात आली होती. दरम्यान, यशवंत जाधव हे बीएमसी स्थायी समितीचे अध्यक्ष असून त्यांच्या पत्नी यामिनी जाधव या भायखळा मतदारसंघातून आमदार आहेत. आयटी विभाग कंत्राटदार बिमल अग्रवाल यांच्या मालकीच्या न्यूजहॉक मल्टीमीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या विविध व्यवहारांची चौकशी करत आहे. यशवंत जाधव यांनी बीएमसीच्या विविध कंत्राटांसाठी ३० कोटी रुपयांची बिमल अग्रवाल यांची बाजू घेतल्याचा संशय आहे.





